अभिनेता शशांक केतकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. २०१७ मध्ये शशांकने प्रियांका ढवळेसह लग्नगाठ बांधली. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकतीच शशांकने बायकोच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “सिग्नलवर एका तृतीयपंथीयाने…”, विशाखा सुभेदारने सांगितला भावनिक किस्सा; म्हणाली, “एक माणूस म्हणून…”

प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त शशांक केतकरने बायकोबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “तू असल्याने जगण्याला अर्थ आहे , नाहीतर हसणेही व्यर्थ आहे. Happy Birthday बायको”, असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “तुम्ही आम्हाला हिंदी बोलण्यास…”, हिंदी भाषेवरून प्रकाश राज यांची अमित शाहांवर टीका; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली…

शशांकने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार मंडळींनी सुद्धा प्रियांकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका ढवळे व्यवसायाने वकील आहे. तसेच मध्यंतरी तिने स्वत:चा स्किनकेअर ब्रॅन्ड सुरु केला होता.

हेही वाचा : “आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमुळे अभिनेता शशांक केतकर प्रसिद्धीझोतात आला. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत अभिनेता अक्षयची भूमिका साकारत आहे. अलीकडेच शशांक महत्त्वाच्या भूमिकेत असलेली ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हिंदी वेबसीरिजमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सर्वांनी त्यांच कौतुक केलं.