अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येचे प्रकरण रोज नवं वळण घेत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटीजसुद्धा यावर प्रतिक्रिया देत आहेत. पोलिससुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. नुकतंच या प्रकरणासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. तुनिषाच्या एक्सबॉयफ्रेंड म्हणजेच शिझान खान याने नुकतंच त्या दिवशी मालिकेच्या सेटवर काय घडलं याबाबत खुलासा केला आहे.

‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार पालघरच्या वळीव पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यानी स्पष्ट केले की शिझान खानने तुनिषा शर्मासोबतचे नाते स्वतःहून संपुष्टात आणले होते, परंतु दोघांचे संबंध चांगले होते आणि ते एकमेकांशी नियमित बोलत होते. तुनिषा शर्माला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शिझानला अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा : ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेत्रीने केलं ‘RRR’चं तोंडभरून कौतुक; म्हणाली, “हा महान चित्रट…”

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी सेटवर नेमकं काय घडलं होतं याबद्दल शिझानने चौकशीदरम्यान खुलासा केला आहे. शिझानच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी शूटिंगदरम्यान लंच ब्रेकमध्ये शिझान तुनिषाला भेटला होता. दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटं बोलणं झालं आणि त्यानंतर शिझान शूटिंगसाठी निघून गेला. यानंतर थेट काही वेळाने तुनिषाचा मृतदेह बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप शिझान आणि तुनिषा यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं आणि नेमकं त्यानंतर काय घडलं याविषयी शिझानने खुलासा केलेला नाही. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. पण शिझान आणि तुनिषामध्ये झालेल्या संभाषणानंतरच ही घटना घडल्याने याबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या आहेत. याबरोबरच पोलिस सध्या शिझान आणि तुनिषा यांच्यात झालेल्या चॅटिंगचाही तपास करत आहेत. शिझान खानच्या बहिणींनी तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे, शिवाय त्याच्यावर लागलेले आरोप बिनबुडाचे असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.