मागच्या काही दिवसांपासून साजिद खानच्या मुद्द्यावरून शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यातील वाद वाढत चालल्याचं दिसत आहे. शर्लिन चोप्रा मीटू चळवळीदरम्यान साजिद खानवर गंभीर आरोप केले होते. पण आता साजिदने बिग बॉस १६ मध्ये एंट्री केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. अलिकडेच शर्लिनने साजिद खानने साजिदच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण या प्रकरणावर राखी सावंतने प्रतिक्रिया दिल्यानंतर दोघींमध्ये वाद सुरू झाला. तेव्हापासून दोघीही एकमेकींवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

शर्लिन चोप्राने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने राखी सावंतवर हल्लाबोल केला आहे. ती राखीला उद्देशून म्हणाली, “शर्लिन चोप्राचा अश्लील व्हिडीओ हा आहे असं म्हणत ती फिरतेय. अगं अश्लील बाई, भिकारी, घाणेरडी, मुंबई क्राइम ब्रांचमध्ये जा, महाराष्ट्र सायबर सेलकडे जा आणि विचार की शर्लिन चोप्राने तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे का? ते सांगतील की हो तिने संपूर्ण माहिती दिली आहे. माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाही जी मी पोलिसांना सांगितलेली नाही. तू काय मला एक्सपोज करणार आहेस. तुझी नाटकं बंद कर. एवढीच हौस असेल तर तुझा भाऊ राज कुंद्राचं पितळ उघडं पाड. तो पॉर्नोग्राफीचा राजा आहे. साजिद मीटू आरोपी आहे. त्याचं सत्य समोर आण. तू स्त्री नावाला कलंक आहेस, जिथे सर्व स्त्रिया एकमेकांबरोबर उभ्या आहेत तिथे तू सर्वाच्या विरोधात बोलत आहेस.”

आणखी वाचा- “मी समाजसेविका आहे आणि…”; राखी सावंतने साजिद खानवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उठवला आवाज

शर्लिनने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “आमचा लढा हा लैंगिक अत्याचार करणाऱ्यासाठी लैंगिक अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध आहे. आम्हाला न्याय मागण्याचा घटनात्मक अधिकार आहे. आमच्याकडून हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आमच्या आरोपींच्या बहिणींनी हे ऐकून समजून घ्यावे. मी कपडे उतरवले म्हणजे लैंगिक अत्याचाराला परवागनी दिली असा अर्थ होत नाही.”

आणखी वाचा-राखी सावंत शर्लिन चोप्राला म्हणाली चेटकीण अन्…; साजिद खानवरुन सुरू झालेल्या वादात दोघींची कॅट फाईट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शर्लिन चोप्राच्या या व्हिडीओवर राखी सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने शाल परिधान केलेली दिसत आहे. ती म्हणते, “शर्लिन चोप्रावर बरेच कलम लावायचे होते, तिच्यामुळे खूप त्रास झाला आहे. तिचे पोलीस ठाणे जुहू आहे, मग ती माझ्या पोलीस ठाण्यात येऊन काय करते आहे. ओशिवरा हे माझे पोलीस ठाणे आहे. ती समोर आल्यास मी तिच्याशी बोलायलाही तयार आहे. मला तिची भीती अजिबात नाही.”