बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिद खानला बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. साजिद खानवर तिने लैंगिक शोषणाचे आरोपही केले आहेत. बिग बॉस सुरू झाल्यानंतर साजिद खानबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे शर्लिन चर्चेत आली आहे. तिने पोलिसांत साजिद विरोधात तक्रार दाखल करत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही याबद्दल पत्र लिहलं होतं.

शर्लिनने साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर राखी सावंतनेही या वादात उडी घेतली. राखीने साजिदचं समर्थन करत शर्लिनवर गंभीर शब्दांत टीका केली होती. या टिकेला शर्लिनने उत्तर दिलं आहे. “राखी सावंत काय करते? ३१ किलोचा मेकअप करुन आलिशान हॉटेलमध्ये जाऊन खासगी कामं करते आणि करुनही घेते. भाड्याने बॉयफ्रेंड आणि नवरा आणते. एका वर्षात त्यांना कंगाल करते आणि सोडून देते”, असं शर्लिनने म्हटलं आहे.

हेही वाचा >> “सहा महिन्यानंतर अजून कोणावर बलात्काराची केस…”, साजिद खानवर आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्रावर राखीची गंभीर टीका

हेही वाचा >> ड्रेसला सेफ्टी पिन लावल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

साजिद खानवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचंही तिने सांगितलं. ती म्हणाली, “आम्ही आंदोलन करणार आहोत. लवकरच आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल यांनाही भेटणार आहोत. जोपर्यंत साजिद खानला शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही”.

हेही पाहा >> Photos : ‘वो लडकी है यहाॅं’, सोनाली कुलकर्णीचं शर्टमध्ये हॉट फोटोशूट, नव्या लूकवर चाहतेही फिदा

राखी सावंत शर्लिन चोप्राबद्दल काय म्हणाली होती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कधी राज कुंद्रावर तर कधी साजिदवर. ही रोज उठून चार किलोचा मेकअप करुन मीडियासमोर येऊन कोणाविरोधात तक्रार करते. सहा महिन्यांनी कोणावर तरी लैंगिक शोषणाचे आरोप करत बलात्काराची केस करताना दिसेल. तू साडी नेसायला आता शिकली आहेस. तू आधी काय कपडे घालायची. आधी स्वत:मध्ये सुधारणा कर. मग दुसऱ्यांना बोल”, असं राखी म्हणाली होती.