‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन आणि अब्दू रोझिक यांच्यात सध्या वाद सुरू आहे. अब्दुने एमसीवर आरोप करत त्यांची मैत्री तुटली असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. एमसी त्याच्याविरोधात अफवा पसरवत असल्याचं अब्दुचं म्हणणं होतं आणि तो फोन उचलत नसल्याचा आरोप त्याने केला होता. त्यानंतर स्टॅनच्या टीमने प्रतिक्रिया देत अब्दूचे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. आता शिव ठाकरेला याबद्दल विचारण्यात आलं, त्याने काय प्रतिक्रिया दिली, पाहुयात.

“तिला तीन गाण्यांसाठी काही लाख अन् आम्हाला टाळ वाजवून…” इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर टीका

शिव ठाकरेला अब्दू व स्टॅनच्या मैत्रीतील दुराव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर हा रुसवा-फुगवा फक्त काही दिवसांसाठी असल्याचं शिवने म्हटलं आहे. “यात मोठी गोष्टी नाही, ते दोघेही खरे आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात काही नसतं, ते मनात असलेलं व्यक्त करून मोकळे होतात. बिग बॉसच्या घरात असतानाही कॅमेऱ्यांची पर्वा ते करत नव्हते, तसंच बाहेरही ते करत नाहीत. त्यांना वाटतं ते बोलतात. त्यांच्यातील वाद हे दोन दिवसाचे रुसवे-फुगवे आहेत. चार-पाच दिवसात ते एकत्र येतील आणि एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतील. नाही झालं तसं तर मी आहेच,” असं शिव म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघांची लवकरच मैत्री होईल, त्यांचे मतभेद दूर होतील. ते झालं नाही, तर आपण त्यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असं शिवने सांगितलं. दरम्यान, अब्दू व एमसी स्टॅन हे घरातील ‘मंडली’चा भाग होते आणि त्यांची चांगली मैत्री होती, पण काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू आहेत.