‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वामधून लोकप्रिय झालेला मराठमोळा शिव ठाकरे चांगलाच चर्चेत असतो. अमरावतीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या शिवला काम मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. ‘बिग बॉस’मध्ये शिव उपविजेता ठरला असला तरी त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अशातच त्याने कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे.

Video: भर उन्हात शेतात राबतेय मराठमोळी अभिनेत्री; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “कोणताच राजकारणी…”

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर शिवने ३० लाखांची कार विकत घेतली, तसेच स्वतःचं एक रेस्टॉरंटही सुरू केलं आहे. अलीकडेच ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेने कास्टिंग काउचबद्दलचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मी एकदा आराम नगरमध्ये ऑडिशनसाठी गेलो होतो आणि तिथे एक माणूस मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, ‘इथे मसाज सेंटर आहे’. मला ऑडिशन आणि मसाज सेंटरचा संबंध लक्षात आला नाही. तो मला म्हणाला, ‘ऑडिशननंतर एक वेळा तू इथे ये. तू वर्कआउटपण करतोस का…’ त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो. कारण तो कास्टिंग डायरेक्टर होता आणि मला कोणताही वाद घालायचा नव्हता. मी सलमान खान नाही. पण या घटनेनंतर मला एक गोष्ट लक्षात आली की कास्टिंग काउचच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही.”

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवने आणखी एका प्रसंगाबद्दल भाष्य केलं. “चार बंगल्यात एक मॅडम होत्या. त्या मला म्हणायच्या, ‘मी याला स्टार बनवलं, मी त्याला स्टार बनवलं.’ त्या मला रात्री ११ वाजता ऑडिशनसाठी बोलावत होत्या. मी एवढाही भोळा नाही की रात्री काय ऑडिशन्स होतात, हे मला समजत नसेल. मला काम आहे, त्यामुळे येऊ शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. यावर त्या म्हणाल्या, ‘तुला काम नाही करायचं का?’ ‘तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही’ अशा गोष्टी ती मला बोलली. असं बोलून ते तुम्हाला डिमोटिव्हेट करतील, पण मला त्याची कधीच पर्वा वाटत नाही,” असं शिव त्याच्या कास्टिंग काउचबद्दलचा अनुभव सांगताना म्हणाला.