‘शिवा’ (Shiva) मालिकेत सध्या आशू व शिवा यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून या जोडप्याच्या आयुष्यात चढ-उतार आल्याचे पाहायला मिळत आहे. आशूची बहीण कीर्ती व शिवाची बहीण दिव्या या दोघींनी मिळून त्यांच्यात गैरसमज निर्माण केले आहेत. शिवा आशूबरोबर खोटे बोलली आहे, त्याच्याशी खोटे वागत आहे, अशी समजूत दिव्याने करून दिली आहे. तर, आशू व नेहावरील हल्ला शिवाने केला, असे कीर्तीने सर्वांना पटवून दिले. त्यामुळे शिवाला घराबाहेर पडावे लागले. आता शिवा तिच्या जुन्या स्टाईलमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, आशू व शिवा यांच्यामध्ये पुन्हा एकदा भांडण होताना दिसत आहे.

याचा शेवटचा धागाही…

शिवा मालिकेचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आशूच्या ऑफिसमध्ये बोर्ड मेंबरची मीटिंग आहे. आशूचे वडील रामभाऊ शिवाची इतर लोकांना या आपल्या नवीन बोर्ड मेंबर म्हणून ओळख करून देतात. बोर्ड मीटिंगमध्ये कामगारांच्या कामाच्या तासांबद्दल चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. आशू व शिवा दोघेही आपापले म्हणणे प्रस्तावरूपाने मीटिंगमध्ये मांडतात. हे प्रस्ताव परस्परविरोधी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातील शिवाच्या प्रस्तावाला मान्यता मिळते. हे पाहिल्यानंतर आशू चिडतो. तो शिवाला म्हणतो, “तू कुठल्या अधिकाराने हे बोललीस?” त्यावर शिवा म्हणते, “कारण- मी इथली मेंबर आहे म्हणून बोलतेय, असं समज.” त्यांचे बोलणे सुरू असतानाच ऑफिसमधील कर्मचारी तिथे येतात आणि आशूला म्हणतात की, साहेब शिवा बरोबर म्हणत आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आशू एकटाच त्याच्या रूममध्ये बसला आहे. त्याची आई सिताई व बहीण कीर्ती तिथे येतात. सिताई त्याला म्हणते की, आशू आज काय झालं हे आम्हाला कळलं आहे. हे नातं तुटलंय आणि याचा शेवटचा धागाही तोडून टाक.”

हेही वाचा: “खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता मालिकेत काय होणार, शिवा व आशू पुन्हा एकत्र येणार का, सिताईच्या मनातील शिवाविषयीचे गैरसमज दूर होणार का, दिव्या व कीर्तीचे सत्य समोर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.