सध्या टेलिव्हिजनवर रीयालिटि शोची चांगलीच चलती आहे आणि लोक असे कार्यक्रम खूप पसंत करतात. असाच एक एमटीव्ही या चॅनलवर येणारा splitsvilla हा शो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. रणविजय, सनी लिओनीसारखे स्टार्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असल्याने एक मोठं तरुण वर्ग हा कार्यक्रम फॉलो करतो. या कार्यक्रमाचं नवं पर्व म्हणेच Splitsvilla X4 ची चांगलीच चर्चा आहे.

या नव्या पर्वात नुकतीच शिवम शर्माने एन्ट्री घेतली आहे. शिवम याआधीसुद्धा या शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकला होता. शिवाय याच वर्षी कंगनाच्या ‘लॉकअप’ या रीयालिटि शोमध्येसुद्धा त्याने भाग घेतला होता. त्यामध्ये तो खेळाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोचला होता. शिवमने बऱ्याच शोमध्ये हजेरी लावली आहे पण आजवर त्याने एकही शो जिंकलेला नाही. याबद्दलच त्याने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “मी झोम्बीसारखी वागायचे…” जेव्हा तुनिषा शर्माने केलेला तिच्या डिप्रेशनबद्दल खुलासा

‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना Splitsvilla मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मी गेल्यावेळेस जेव्हा या शोमध्ये आलेलो तेव्हा मी जिंकलो नव्हतो. मला ठाऊक आहे की मी लोकांचं भरपूर मनोरंजन करतो त्यामुळेच प्रेक्षक मला पसंत करतात. जशी राखी सावंत बिग बॉससारख्या शोमध्ये बऱ्याचदा वाइल्ड कार्ड एन्ट्री घेते तसंच माझं आहे. तीसुद्धा अद्याप कोणताही सीझन जिंकलेली नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल पुढे बोलताना शिवम म्हणाला, “या शोमध्ये पुन्हा येणं हेच माझ्यासाठी विजयापेक्षा कमी नाही. बरं झालं मी आधीच्या पर्वात जिंकलो नाही, नाहीतर मला दुसरी संधी मिळाली नसती. मी पुरुष रूपातील राखी सावंत आहे. जिंकणं हे माझं ध्येय नाही, प्रत्येक पर्वात हजेरी लावून मी लोकांचं मनोरंजन करणंच पसंत करेन.” या रीयालिटि शोजबरोबरच शिवमने ‘दिल्ली बेली’, ‘पटेल की पंजाबी शादी’ अशा चित्रपटातही काम केलं आहे.