प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या गेल्या भागामध्ये खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबद्दल कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती, याबद्दल भाष्य केले.

झी मराठीने नुकतंच संजय राऊत यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी संजय राऊत हे त्यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे. यावेळी अवधूत गुप्तेने संजय राऊत यांना त्यांची पत्नी वर्षा राऊत आणि मुलींबद्दल प्रश्न विचारला.
आणखी वाचा : Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…

तुमची जोडी अनुरुप आहे. या संकटांच्या काळात आणि वादाच्या दरम्यान तुमच्या रिलेशनशिपवर काही परिणाम झाला का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला. त्यावर त्यांनी मनमोकळेपणे उत्तर देत “या सर्वाचा माझ्या कुटुंबावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी मला आहे तसं स्वीकारलं आहे”, असं सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझी पत्नी वर्षा, दोन्ही मुली, माझे भाऊ या सर्वांना माहिती होतं की गुडघे टेकणं हे माझ्या स्वभावात नाही. मी वाकणार नाही, मी शरण जाणार नाही. मी एकवेळ मरण पत्करेन, हे त्यांना महिती होतं. त्यांनी मला यात पाठिंबा दिला. तू जसा आहेस तसाच वाग असं ते मला वारंवार सांगायचे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“तुझी जी हिंमत आहे ती माझी हिंमत. त्यांनाही आपल्या नवऱ्याने, आपल्या बापाने शरणागती पत्करलीय हे त्यांना आवडलं नसतं”, असेही त्यांनी म्हटले.