झी मराठीवरील ‘चल हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमातील कलाकारांनाही प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेही या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे आणि सोशल मीडियावरही तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा श्रेया तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या कामाचे अपडेट देत असते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

श्रेया बुगडे आज लग्नाचा ८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिने पतीसाठी खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमधून श्रेयाने पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेया बुगडेची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत तिला लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- “कियारा डुप्लिकेट विकी कौशल मात्र…” श्रेया बुगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष

श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिलं, “मी तुला वचन देते की तुझ्या सलूनच्या अपॉइंटमेंट्स नेहमी बुक करेन, जसं आपण ठरवलं त्याप्रमाणे काहीतरी पाहत तिसऱ्या मिनिटाला झोपून जाऊ, तुला किंवा मला कितीही उशीर झाला तरीही तुझे कपडे मीच निवडेन. किमान सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण बनवून तुला खाऊ घालेन. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी कायमच तुझे सूर्यास्त आणि बीच पार्टनर असेन. लग्नाच्या ८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

आणखी वाचा- “निर्मिती सावंत यांच्याबरोबर…” श्रेया बुगडेने सांगितली तिची बकेट लिस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. याच कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे ही प्रसिद्धीझोतात आली आहे.