प्रेक्षकांची लाडकी श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नदीच्या अभिनयाने आणि नृत्य आणि प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. पुष्पा या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटामुळे तिचा फॅन फॉलोइंगही प्रचंड वाढलं. आता पहिल्यांदाच तिचा मराठमोळा अंदाज ‘झी चित्र गौरव पुरस्कार’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तर तिच्या या मराठमोळ्या अंदाजाने अभिनेता श्रेयस तळपदेही फिदा झालेला दिसला.

अभिनेता श्रेयस तळपदे याने रश्मिका मंदाना हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी आवाज दिला होता. त्यामुळे रश्मिका आणि श्रेयस आधीपासून एकमेकांना ओळखत आहेत. तर आता ते या कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र दिसले.

आणखी वाचा : ‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”

‘झी चित्र गौरव पुरस्कार’मधील रश्मिका मंदाना आणि श्रेयस तळपदे यांचा एक नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेला दिसत आहे. तर रश्मिका सादरीकरण करण्यासाठी स्टेजवर आलेली पाहायला मिळत आहे. रश्मिकाला पाहून श्रेयस फिदा झालेला दिसला. तू त्याच्या एक्सप्रेशन्सने रश्मिकाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. तर यावेळी श्रेयसने ‘पुष्पा’ चित्रपटातील त्याचा प्रसिद्ध डायलॉगही म्हणून दाखवला. त्यानंतर रश्मिकाने श्रेयसला फ्लाइंग किस दिली.

हेही वाचा : “विराजसने मला…” शिवानी रांगोळेने सांगितलं बरेच महिने छोट्या पडद्यापासून दूर राहिल्याचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्यांचा हा व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये खूपच चर्चेचा विषय ठरत असून श्रेयस आणि रश्मिकाचा हा अंदाज सर्वांनाच आवडलेला दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत त्यांच्यातली ही केमिस्ट्री खूप आवडल्यास त्यांचे चाहते सांगत आहेत. तर त्याचबरोबर अनेकांनी “आम्हाला तुम्हा दोघांनाही एकत्र स्क्रीनवर पाहायला आवडेल,” असंही सांगितलं.