बहुचर्चित ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय मराठी शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अवधुत गुप्तेने सूत्रसंचालन केलेला हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या शोच्या नवीन पर्वासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या नव्या पर्वाचे काही प्रोमोही प्रदर्शित करण्यात आले आहेत.
‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या नवीन पर्वाची चर्चा सुरू असतानाचा या कार्यक्रमातील जुने काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या शोच्या आधीच्या पर्वात अनेक सेलिब्रिटी व राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. अभिनेता सिद्धार्थ जाधव व संजय नार्वेकर यांनी हजेरी लावली होती. या मुलाखतीत सिद्धार्थने अप्सरा आली या लोकप्रिय गाण्यावर केलेली कविता ऐकवली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा>> Video : अमेरिकेच्या रस्त्यावर मराठी अभिनेत्याचा आईसह ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
‘फिलमवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन सिद्धार्थ जाधवचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “क्षणभर विश्रांती चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी केलेल्या या कविता आहेत. मी व संजय जाधव…आम्ही टाइमपास म्हणून अशा कविता करायचो,” असं सिद्धार्थ म्हणाला.
‘अप्सरा आली’ गाण्यावर सिद्धार्थ जाधवची कविता
कोमल बारमध्ये झपकन शिरलो, ऑर्डर दिली वेटरला…
वेटर आला, गालात हसला, कॉटर दिली त्याने मला…
ही कॉटर नकली, इंग्लिश असली, आणायला सांगितली…
मी चार चार बाटल्या झपझप घेतली, चक्कर मला आली…
झपकन आली…
हेही वाचा>> ‘द केरला स्टोरी’चे शो जर्मनीतही हाऊसफुल! तिकीट बुकिंगचा फोटो शेअर करत अदा शर्मा म्हणाली…
सिद्धार्थची कविता ऐकल्यानंतर खुपते तिथे गुपतेवर कविता केली नाही का? असं अवधूत गुप्ते त्याला विचारतो. यावर उत्तर देत सिद्धार्थ म्हणतो, “अजून मला सुचलं नाही. मला आधी चाल सुचते. मग कविता सुचते.” पुढे अवधूत गुप्ते त्याला “जितेंद्र जोशीसाठी तू स्पर्धस आहेस,” असं म्हणतो. “जितेंद्र माझा पुतळा लावून कविता लिहितो. तो एकलव्य आहे आणि मी त्याच्यासाठी द्रोणाचार्य आहे. त्याच्याकडे माझा फोटो आहे. जितेंद्र मस्ती करतोय,” असं मजेशीर उत्तर सिद्धार्थ अवधुत गुप्तेला देतो.
दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ शोचा नवीन सीझन येत्या ४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रात्री ९ वाजता हा शो प्रसारित होणार आहे. या शोच्या नवीन पर्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत.
