अनाथांची आई अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास लवकरच छोट्या पडद्यावरील एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

हेही वाचा : “कौरवांनी द्रौपदीचे कपडे…”, मणिपूर घटनेवर कुशल बद्रिकेची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, “श्री कृष्णाची…”

मालिकेच्या प्रोमोमध्ये सिंधुताईंची भूमिका कोणी साकारली याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, या भूमिकेला अभिनेत्री आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळख जाणाऱ्या मेघना एरंडेने आवाज दिल्याचे समोर आले आहे. मेघनाने आजवर बऱ्याच गाजलेल्या व्यक्तिरेखांना आवाज दिला आहे.

हेही वाचा : “आमचं गोंडस बाळ…”, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीशी अमृता खानविलकरचं आहे खास नातं, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

मेघना एरंडेने खास पोस्ट शेअर करत ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. यामध्ये अभिनेत्री लिहिते, “माझे अहो भाग्य की मला माननीय पद्मश्री सिंधुताई ह्यांना डब करण्याची सुवर्णसंधी मिळाली. सिंधुताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अडथळ्यांची शर्यत चिंधीने प्रेमाने जिंकली, अनाथ लेकरांची आई “सिंधुताई”झाली..” मेघनाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही जणांनी “आम्ही आधीच तुझा आवाज ओळखला होता”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : “मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा”, युजरने आव्हान दिल्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, “इतका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” ही नवी चरित्रकथा ‘कलर्स मराठी’वर १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेत बिग बॉस फेम किरण माने महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये ‘सिंधुताईं’ची भूमिका कोण साकारणार? आणि यामधील इतर कलाकारांची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नाही.