Smriti Irani Talks About 8 Hour Shift Demand : स्मृती इराणी यांनी जवळपास दोन दशकांनंतर टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. सध्या त्या पुन्हा एकदा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून तुलसीच्या भूमिकेतून पाहायला मिळत आहे. अशातच नुकतंच त्यांनी मनोरंजन क्षेत्रात सुरू असलेल्या गोष्टींबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
स्मृती इराणी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी दिवसाला फक्त ८ तास काम करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. दिवसाला काम करण्याच्या तासांबद्दल स्मृती यांनी सांगितलं की प्रोडक्शन हाऊससमोरही काही आव्हानं असतात. यावेळी त्या म्हणाल्या, “कामाचे तास हे आव्हानंच असतं, कारण आम्हाला काम करावंच लागतं. तुम्हाला एका चॅनेलसाठी काम करायचं असतं त्यावेळी तुम्हाला प्रेक्षकांसाठी काँटेंट तयार करावाच लागतो. तेव्हा तुम्ही निर्मात्यांना आज माझी काम करण्याची इच्छा नाही असं म्हणू शकत नाही, याचा कोणीही स्वीकार करणार नाही.”
टेलिव्हिजनमध्ये असे नखरे खपवून घेतले जात नाही – स्मृती इराणी
स्मृती पुढे याबद्दल म्हणाल्या, “माझा कोणताही ग्रुप नाही. माझा कधीच कोणता ग्रुप नव्हताच. एकतर टेलिव्हिजनमध्ये असे नखरे खपवून घेतले जात नाहीत. दुसरी गोष्टी माझा कधीच कोणता ग्रुप नव्हताच. मी सुरक्षारक्षकांबरोबर फिरत नाही. मला माहीत आहे की मी सुरक्षारक्षकांबरोबर फिरते अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या.”
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने ‘स्पिरिट’ चित्रपटातून एक्झिट घेण्याआधी केलेल्या आठ तासांच्या कामाच्या मागणीबद्दल अजूनही अनेक जण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. स्मृती यांनीसुद्धा याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, स्त्री आणि पुरुष यांच्यासमोर वेगवेगळी आव्हानं असतात, त्यामुळे त्यांच्यात तुलना केली जाऊ शकत नाही. विशेषकरून जेव्हा अभिनेत्री गरोदर असते.
स्मृती यांनी त्यांचा अनुभव सांगत, त्यांनी त्या गरोदर असतानाही गरोदरपणात शूटिंग केलं होतं आणि निर्मात्यांना त्या कृलाकृतीतून यश मिळावं यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात असंही सांगिलं.