बिग बॉस १६ ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कधी घरात वाद, भांडण पाहायला मिळतात तर प्रेमाचे रंग उधळले गेलेले दिसतात. पण आता नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये असं काही घडलं की घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकही हैराण झाले आहेत. बिग बॉस १६ च्या सदस्य श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्मा यांनी सर्वांसमोर एकमेकींना लिपलॉक किस केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरला झाला आहे.

श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्मा एकमेकींना लिपलॉक किस करत असतानाचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात या दोघींना असं करताना पाहून अब्दू आणि शिव डोक्यावर हात मारून घेताना दिसत आहेत. तर सोशल मीडियावर याबाबत उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा- राजेश खन्ना-डिंपल यांनी तब्बल २७ वर्षे वेगळं राहूनही घेतला नाही घटस्फोट, सनी देओल होता त्यामागचं कारण?

बिग बॉसच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये शिव ठाकरे, अब्दू रोजिक, सौंदर्या शर्मा आणि श्रीजिता डे गप्पा मारताना दिसत आहेत. बोलता बोलता सौंदर्या आणि श्रीजिता अब्दूला चिडवण्यासाठी एकमेकींना किस करतात. सुरुवातील तर श्रीजिता किस करताना आपली बोटं ओठांच्या मध्ये ठेवते. पण नंतर दोघीही एकमेकींच्या ओठांवर किस करताना दिसतात.

आणखी वाचा- “प्रत्यक्षात बालाजीचे…” तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर तेजस्विनी लोणारीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौंदर्य आणि श्रीजिता असं किस करताना पाहून शिव आणि अब्दू जोरजोरात हसू लागतात. नंतर अब्दू म्हणतो की, “अरे हे काय होतं.” यावर श्रीजिता म्हणते, “जर तू प्रेम करतोस तर शिवला किस कर.” यानंतर एकीकडे श्रीजिता अब्दूला सांगते की सौंदर्याशी तिचं भांडण झालं होतं मात्र आता दोन दिवसांनंतर हे भांडण मिटलं आहे आणि त्या दोघीही खूप खूश आहेत. दुसरीकडे शिव म्हणतो, “अरे हे आपण काय पाहिलं?” त्यावर सौंदर्या, “तू मला जज करू नकोस.” असं म्हणत अब्दूच्या गालावर किस करते.