अभिनेत्री स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. विविध मालिका, चित्रपट, नाटकांमधून तिने अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. पण तिला एकदा शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी चालून आली होती असा खुलासा तिने आता केला आहे.

स्पृहा आतापर्यंत तिच्या करिअरबद्दल स्पष्टपणे भाष्य करत आली आहे. तिच्या कामाबद्दलचे अपडेट्स ती सोशल मीडियावरून चाहत्यांना देतच असते पण आता एका हुकलेल्या संधीबद्दल तिने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “…म्हणून स्पृहाच्या ऐवजी मला ‘सूर नवा ध्यास नवा’साठी विचारण्यात आलं,” रसिका सुनीलने सांगितलं कारण, जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री?

नुकताच स्पृहाचा वाढदिवस झाला आणि त्यानिमित्त ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या वाढदिवसाला शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांनी मला शुभेच्छा दिल्या तर मला खूप आनंद होईल. शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली होती पण तो योग आला नाही. मी एक जाहिरात करणार होते. त्या जाहिरातीची बोलणी बऱ्यापैकी पुढे गेली होती. पण ज्या दिवशी शूटिंग करायचं ठरलं होतं त्या तारखा पुढे गेल्या आणि नेमकं बदललेल्या तारखांना माझं दुसऱ्या एका प्रोजेक्टचं शूटिंग होतं. त्यामुळे मला ती जाहिरात करता आली नाही. त्या जाहिरातीमध्ये शाहरुख खानही होता. या गोष्टीचं मला फार वाईट वाटलं.”

हेही वाचा : जो मुलगा सुरुवातीला अजिबात आवडायचा नाही त्याच्याशीच झालं लग्न, ‘अशी’ आहे स्पृहा जोशीची फिल्मी लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “असंच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मी काम करण्याच्या बाबतीतही घडलं आहे. ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे, मी त्यांच्याबरोबर एक जाहिरात करणार होते पण काही कारणाने जाहिरातीच्या शूटिंगच्या तारखा बदलल्या गेल्या आणि बदललेल्या तारखांना दुसऱ्या कामाच्या कमिटमेंटमुळे शूटिंग करणं मला शक्य नव्हतं.” आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.