‘उंच माझा झोका’ या मालिकेमुळे अभिनेत्री स्पृहा जोशी घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने रमाबाई रानडे यांची भूमिका साकारली होती. ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून स्पृहाने आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर अभिनेत्रीने चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. स्पृहाने नुकतीच ‘आरपार’ युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी तिने अनेक विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडलं.

स्पृहाला जोशीला यावेळी “काही वर्षांपूर्वी तू एक फोटोशूट केलं होतं त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला होता याविषयी तुला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला.” अभिनेत्री यावर मत मांडताना सांगते, “ही साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुळात जेव्हा मी फोटोशूट केलं तेव्हा त्यात फार काही रिव्हिलिंग नव्हतं. त्यात मी हॉल्टरनेक ब्लाऊज परिधान केला होता. पहिली गोष्ट म्हणजे, हॉल्टरनेक ब्लाऊज आतापर्यंत कोणी घातलेला नाही अशातला भागच नाही…आपल्या आसपास आपण असे कितीतरी जण पाहतो.”

हेही वाचा : ऐश्वर्या नारकर ‘अशी’ घेतात त्वचा आणि लांबसडक केसांची काळजी! व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

स्पृहा पुढे म्हणाली, “दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एका पद्धतीची भूमिका जर कोणी करत असेल, तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे असं अजिबात नसतं किंवा संबधित व्यक्ती तशीच आहे असा अट्टाहास करणेही योग्य नाही. अशाने मला कामच करता येणार नाही. कारण, सतत मला अठराशेच्या शतकातील भूमिका कोणीच देणार नाहीत.”

हेही वाचा : ४२ वर्षीय शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी केलं तिसरं लग्न; दोघांच्या वयात आहे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांचं अंतर

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सतत मी त्याच भूमिका करत राहिले, तर प्रेक्षक आणि कालांतराने मी स्वत:ही कंटाळेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वत:चा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेण्यासाठी आणि काहीतरी नवनवीन करण्यासाठीच आपण अभिनयाच्या क्षेत्रात येतो. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला परकाया प्रवेश करता यावा हे माझं अभिनय क्षेत्रात येण्याचं खरं कारण आहे.” असं स्पृहाने सांगितलं.