स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती. पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेची झलक पाहायला मिळाली. यानंतर आता आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट समोर आली आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका येत्या १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे जानकी रणदिवे हे प्रमुख पात्र साकारेल, तर तिच्या लेकीच्या भूमिकेत बालकलाकार आरोही सांबरे झळकणार आहे. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारांची नावं देखील आता समोर आली आहे.

हेही वाचा : गोव्याहून मुंबईत आल्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगावकर; म्हणाल्या, “त्यांचा स्वभाव फार…”

अभिनेत्री सविता प्रभुणे या मालिकेत जानकीच्या सासूबाईंची भूमिका साकारणार आहे. तसेच आरोहीच्या नाना आजोबांच्या भूमिकेत प्रमोद पवार झळकणार आहेत. याशिवाय अभिनेता उदय नेने मालिकेत सारंग ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सगळ्या कलाकारांची झलक नव्या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : कौलारू घर, नदी, आंब्याची बाग अन्…; कोकणात आहे रवी जाधव यांचं सुंदर घर; म्हणाले, “संगमेश्वर तालुक्यात…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका येत्या १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. रेश्मा शिंदेबरोबर मालिकेत प्रमुख अभिनेत्याची भूमिका कोण साकारणार हे अद्याप उघड करण्यात आलेलं नाही.