Marathi Serial TRP Updates : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही दर आठवड्यात येणाऱ्या टीआरपीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते. गेल्या तीन वर्षांपासून सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीमध्ये अधिराज्य गाजवत आहे. तर, ‘झी मराठी’वर सध्या ‘कमळी’ अव्वल स्थानी आहे.

११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत कोणत्या मराठी मालिकांना सर्वाधिक टीआरपी मिळालाय याची आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे. या यादीत पहिल्या पाच मालिका ‘स्टार प्रवाह’च्या आहेत. त्यामुळे टीआरपीमध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळाला.

स्टार प्रवाहच्या मालिकांचा TRP

  • ठरलं तर मग – ५.३
  • घरोघरी मातीच्या चुली – ४.७
  • कोण होतीस तू, काय झालीस तू – ४.५
  • नशीबवान – ४.४
  • लक्ष्मीच्या पाऊलांनी, तू ही रे माझा मितवा – ४.२

याशिवाय ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘येड लागलं प्रेमाचं या मालिकांना अनुक्रमे ४.१ आणि ३.८ इतका टीआरपी मिळाला आहे.

तर, ‘झी मराठी’वर कमळी मालिकेने अव्वलस्थान मिळवलं आहे. या पाठोपाठ हर्षदा खानविलकरांची ‘लक्ष्मी निवास’ मालिका दुसऱ्या स्थानी तर, तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ‘झी मराठी’वर तिसऱ्या स्थानावर आहे. तेजश्रीच्या मालिकेच्या टीआरपीत तुलनेने आधीपेक्षा वाढ झाल्याचं दिसत आहे.

झी मराठीच्या मालिकांचा TRP

  • कमळी – ३.७
  • लक्ष्मी निवास – ३.४
  • वीण दोघांतली ही तुटेना – ३.३
  • तारिणी – ३.०
  • देवमाणूस – २.८

आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदी-समरची लगीनघाई सुरू होणार आहे. त्यामुळे या विवाह विशेष भागांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा लग्नसोहळा एकदम ग्रँड होणार आहे. याशिवाय ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांच्या महासंगमला २.१ इतकाच टीआरपी मिळाला आहे.

दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून ( २७ ऑक्टोबर ) ‘काजळमाया’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे वाहिनीने दोन मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत. आता ही नवीन मालिका ओपनिंग टीआरपी किती आणणार, ‘तू ही रे माझा मितवा’ला वेळ बदलल्याचा किती फायदा होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.