स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या मालिकेत शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. त्यानंतर आता यात गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत गौरी हे पात्र अभिनेत्री गिरीजा प्रभू साकारत आहे. नुकतंच तिने तिचे खरे वय किती याचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री गिरीजा प्रभू ही ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’ या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. आज गिरीजा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिने तिचे खरे वय काय, हे सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी-मल्हार परत एकत्र येणार? अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “लवकरच…”

गिरीजाने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने सप्तरंगी रंगाचा वनपीस परिधान करुन फोटोशूट करताना दिसत आहे. त्यात तिने २४ आकडा लिहिलेले दोन फुगे हातात घेतले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने “हॅलो २४” असे म्हटले आहे.

गिरीजाचा जन्म २७ नोव्हेंबर २००० रोजी झाला. तिला नुकतंच २३ वर्ष पूर्ण झाली असून ती २४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “कथा कशी मांडावी…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “मी लेखक नसल्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरीजाच्या या पोस्टवर तिचा सहकलाकार अभिनेता मंदार जाधव यानेही कमेंट केली आहे. त्याने यात “वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे म्हटले आहे. तर अभिजीत खांडकेककरने “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, अशी कमेंट यावर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.