छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. मालिकाविश्वातील अनेक ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतात. अशीच एक सर्वांची लाडकी जोडी म्हणजे सिद्धार्थ आणि अनु. ‘हे मन बावरे’ या मालिकेमुळे ही जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेता शशांक केतकरने सिद्धार्थ, तर अभिनेत्री मृणाल दुसानिसने अनु ही भूमिका साकारली होती.

‘हे मन बावरे’ मालिका २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर २०२० मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप केला. जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जायची. आज मालिका संपून चार वर्षे झाली असली तरीही सिद्धार्थ-अनुच्या जोडीने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांनी सुरक्षा वाढवली

‘हे मन बावरे’ मालिका संपल्यावर मृणाल दुसानिसने कलाविश्वातून काही काळ ब्रेक घेतला होता. ती नवरा आणि लेकीसह परदेशात राहत होती. जवळपास चार वर्षांनी गेल्या महिन्यात मृणाल भारतात परतली. सध्या तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींची ती भेट घेत आहे. भारतात परतल्यावर अभिनेत्रीने नुकतीच ‘हे मन बावरे’मध्ये एकत्र काम केलेल्या शशांक केतकरची भेट घेतली. अनेक वर्षांनी आपल्या मैत्रिणीला भेटल्यावर शशांक सुद्धा प्रचंड आनंदी झाल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

“सिद्धार्थ अनुची भेट! मृणाल दुसानिस वेलकम बॅक…’हे मन बावरे’ ही मालिका संपून ४ वर्षे झाली पण, ‘अजूनही परत परत बघतो’ अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते. मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल काय? कलर्स मराठी” असं कॅप्शन देत शशांकने मृणालबरोबर खास फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण

shashank ketkar
शशांक केतकरच्या पोस्टवर कमेंट्स
View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शशांकने शेअर केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शशांक-मृणालची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत. “ही जोडी पुन्हा बघायला कोणाला नाही आवडणार?”, “सुखाच्या सरींनी हे मन बावरे”, “ताई तू कुठलीही मालिका घेऊन ये तू पुन्हा टीव्हीवर दिसणार हेच माझ्यासाठी खूप आहे”, “काय मग सिदश्री येणार ना दुसऱ्या पार्टमध्ये?” अशा कमेंट्स शशांकने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.