‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वातील स्ट्राँग सदस्य व अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात सुम्बुलनं आपल्या सावत्र आईविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत सुम्बुलला पुरस्कार मिळाल्यानंतर होस्ट विचारतो, “तू वडिलांसारखी आहेस, हे नेहमी सांगतेस. पण, तुझ्या यशस्वी कारकिर्दीत आईचाही तितकाच खारीचा वाटा असेल ना?” यावर सुम्बुल म्हणते, “पहिल्यापासूनच माझ्याबरोबर आई नव्हती. म्हणजेच माझ्या वडिलांचा घटस्फोट झाला, तेव्हा मी अवघ्या सहा वर्षांची होती. तसेच माझी बहीण तीन वर्षांची होती. काही दिवसांपूर्वी मी वडिलांचं दुसरं लग्न लावून दिलं. आता माझ्या जवळ अजून एक छोटी बहीण आहे; जी तीन वर्षांची आहे. त्यामुळे आता आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे.”

हेही वाचा – इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्याच्या घरचं जेवण सर्वात जास्त आवडतं?, महेश मांजरेकर म्हणाले…

हेही वाचा – “त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली…..”; हेमा मालिनी यांनी सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

‘इमली’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुम्बुलच्या नव्या आईचं नाव निलोफर आहे. जून महिन्यात सुम्बुलनं ईदच्या मुहूर्तावर वडिलांचं दुसरं लग्न लावून दिलं होतं. यावेळी फोटो आणि व्हिडीओतून सुम्बुलनं चाहत्यांना नव्या बहिणीची ओळख करून दिली होती; पण सावत्र आईचा चेहरा दाखवला नव्हता.

हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुम्बुलच्या दुसऱ्या आईचाही पहिला घटस्फोट झाला आहे. तिला एक मुलगी असून, तिचे नाव इजरा असं आहे. तौकीर हसन म्हणजे सुम्बुलच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीविषयी कोणतीही माहिती नाही. तसेच सुम्बुल कधीही पहिल्या आईविषयी खुल्यापणानं बोललीसुद्धा नाही.