कलर्स वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मालिकेतील लतिका व अभिमन्यूची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील लतिका-अक्षयची क्यूट मुलीगीही प्रेक्षकांना भावली.

अभिनेत्री अक्षया नाईक या मालिकेत लतिकाची भूमिका साकारत आहे. याच मालिकेतून अक्षयाला प्रसिद्धी मिळाली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षया ट्रक चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे याआधी अक्षयाने कधीच गाडी चालवली नसल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण मालिकेसाठी तिने ट्रक चालवल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा >> समीर चौगुलेंनी शेअर केला तरुणपणीचा फोटो, प्राजक्ता माळीचा डायलॉग कमेंट करत चाहते म्हणाले…

हेही वाचा >> सारा खानला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर शुबमन गिलने सोडलं मौन, म्हणाला…

अक्षयाने व्हिडीओ शेअर करत कलर्स वाहिनी व मालिकेच्या टीमचे आभार मानले आहेत. “नेहमीच काहीतरी नवीन व आव्हानात्मक करायला मिळतं”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अक्षयाचा ट्रक चालवताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत अक्षयाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा >> Shraddha Murder Case: ‘डेक्सटर’ वेब सीरिज पाहून केले प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे; पण या ‘Dexter’ ची कथा आहे तरी काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षयाने मराठीप्रमाणेच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘बिग एफ’मध्येही ती दिसली होती.