एका अभिनेत्रीला तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इतकी लोकप्रियता मिळाली की सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा असायची. १९ व्या वर्षी तिला एका गाण्याने देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली. त्याकाळी फक्त एका गाण्यामुळे लोकप्रियता मिळालेली कदाचित ती एकमेव अभिनेत्री असेल. या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवलं, तिला एक सिनेमा मिळाला ज्यात तिने अक्षय कुमार, सलमान खानबरोबर कामही केलं. पण नंतर मात्र तिचं करिअर फारसं चमकलं नाही.

या अभिनेत्रीला काम मिळत होतं, पण तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे ती काम करू शकत नव्हती. तिला फिट यायचे त्यामुळे अभिनय करिअर सोडून तिला आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं लागलं. एकदा तिनेच याबाबत खुलासा केला होता. नंतर ही अभिनेत्री टीव्ही रिअॅलिटी शोकडे वळली. आताही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ४१ वर्षांच्या या अभिनेत्रीने १० वर्षांपूर्वी अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. दोघेही सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करत असतात.


आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव शेफाली जरीवाला. २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडीओमुळे ती व्हायरल झाली. या गाण्याने तिला खूप लोकप्रियता मिळाली व ती देशभरात प्रसिद्ध झाली. हे गाणं डीजे डॉल या अल्बमचा भाग होतं. गाणं हिट झाल्यावर शेफाली ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तिने ‘मुझसे शादी करोगी’ मध्ये कॅमिओ केला होता. ज्यात तिने सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह स्क्रीन शेअर केली. पण, २००४ मध्ये रिलीज झालेला हा तिचा शेवटचा बॉलीवूड चित्रपट होता.

लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

२०२० मध्ये एका मुलाखतीत शेफालीने खुलासा केला होता की ती १५ वर्षांची होती तेव्हापासून तिला अपस्मार (फिट येते) आहे. या आजारामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागायचा, याचा परिणाम तिच्या सिनेसृष्टीतील करिअरवर झाला. तिला तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं लागलं, ज्यामुळे तिला जास्त काम करता आलं नाही.

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन

शेफाली २००८ मध्ये रिॲलिटी शोकडे वळली. तिने २००८ मध्ये ‘बूगी वूगी’मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. मग ती ‘नच बलिये’च्या दोन सीझनमध्ये दिसली. तिने २०११ मध्ये ‘हुडागारू’ नावाचा कन्नड चित्रपट केला. २००४ नंतर तिचा हा एकमेव चित्रपट रिलीज झाला. २०१८ मध्ये, तिने ‘बेबी कम ना’ यातून ओटीटीवर पदार्पण केले. यात तिने मुख्य भूमिका साकारली होती, हा शो अल्ट बालाजीवर प्रसारित झाला होता. शेफाली टीव्हीवर अखेरची २०१९ मध्ये ‘बिग बॉस १३’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.