Happy Birthday Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झालेले त्याचे सहस्पर्धक देखील आज त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर करत आहेत. यापैकी अंकिता वालावलकरने सूरजला शुभेच्छा देण्यासाठी थेट फोन केला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंकिता वालावलकर सूरज चव्हाणला शो सुरू झाल्यापासून आपला भाऊ मानते. तर, सूरज देखील ‘कोकण हार्टेड गर्ल’ला ‘अंकिता ताई’ अशी हाक मारतो. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यावर अंकिताने सूरजला अनेक गोष्टींची समज दिली. एवढंच नव्हे तर, ‘शिक्षण पूर्ण करून खूप मोठा हो’ असा सल्ला देखील तिने ‘बिग बॉस’च्या विजेत्याला दिला होता. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अंकिताने सूरजकडे गोड तक्रार केली आहे आणि सूरजने देखील आपल्या मानलेल्या बहिणीची मोठ्या मनाने समजूत काढल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “सूरज चव्हाण हे नाव माझ्या आयुष्यात…”, सूरजला मिठी मारताच पंढरीनाथचे डोळे पाणावले, वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट

अंकिता व सूरजमधलं संभाषण

अंकिता – हॅलो कुठे आहेस… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
सूरज – धन्यवाद…ताई
अंकिता – अरे कुठे आहेस तू? तुला केव्हापासून फोन करतेय. तुझा फोन कोणीतरी दुसरेच लोक उचलत आहेत. त्यांना मी सांगितलं फोनवर…मी येतेय पण, ते मला म्हणाले याच वेळेत भेटता येईल वगैरे… आता वेळ नाहीये अशी उत्तरं त्यांनी मला दिली आहेत.
सूरज – अगं ये ना तू… कधी येणार मला सांग?
अंकिता – तू आता किती दिवस गावी आहेस?
सूरज – मी दिवाळीपर्यंत गावीच आहे. तू कधीही ये…
अंकिता – ठिके… मग मी फोन कोणाला करू? तुझा नंबर दे मला…ते लोक माझ्याशी नीट बोलत नाहीत.
सूरज – अगं मी आताच फोन घेतलाय… देतो मी तुला नंबर…
अंकिता – तुझा नंबर दे… ते लोक मला नीट सांगत नाहीत.
सूरज – ते लोक नीट नको बोलूदेत. मी आहे ना? तू ये.

हेही वाचा : Video: KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धकाने घेतला ‘हा’ निर्णय; अमिताभ बच्चन यांना बसला धक्का, म्हणाले, “मी आज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिता आणि सूरजचं हे संभाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भावा-बहि‍णींची जोडी प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली आहे. आता अंकिता सूरजला भेटायला त्याच्या मोढवे गावी केव्हा जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.