Suraj Chavan On Kedar Shinde : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं विजेतेपद पटकावल्यावर सध्या सूरज चव्हाणचं नशीब पूर्णपणे बदलून गेलं आहे. गेल्या ३ महिन्यांपासून त्याला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्याच्यातला साधेपणा प्रत्येकाला भावला. सूरजला शोमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल सध्या प्रेक्षक ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे तसेच प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांचं देखील कौतुक करत आहेत.

सूरज स्वत: देखील प्रत्येकवेळी माध्यमांशी संवाद साधताना ‘बिग बॉस’च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो. हा गुलीगत किंग आज ( १९ ऑक्टोबर ) आपला ३० वा वाढदिवस करत आहे. यानिमित्ताने त्याने ‘एबीपी माझा’च्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने केदार शिंदेंबद्दल आपल्या भावना व्यक्त त्यांचे आभार मानले. याशिवाय नवीन फोन घेऊन त्यांचा फोन नंबर कोणत्या नावाने सेव्ह करणार हे देखील सूरजने त्याच्या चाहत्यांना सांगितलं.

हेही वाचा : Suraj Chavan – सूरज चव्हाणचं टोपणनाव माहितीये का? सगळे गावकरी त्याचं नावाने मारतात हाक! काय आहे भन्नाट किस्सा? जाणून घ्या…

केदार शिंदेंबद्दल काय म्हणाला सूरज?

‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड तसेच लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याबद्दल बोलताना सूरज ( Suraj Chavan ) म्हणाला, “केदार सर माझ्यासाठी देव आहेत. त्यांनी मला मुलगा मानलंय आणि आता ते ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट एकदम माझ्या पॅटर्नमध्ये काढत आहेत. मी खरंच त्यांचा आभारी आहे.”

“आता मी नवीन फोन घेणार आणि केदार सरांचा नंबर ‘हार्ट’ इमोजी टाकून सेव्ह करणार. केदार सरांना मी माझ्या हृदयात ठेवतो… ते कायम माझ्या हृदयात राहणार… आता ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा माझा देव म्हणजेच केदार सर बनवत आहेत…त्यामुळे हा चित्रपट आल्यावर तुम्ही सर्वांनी नक्की बघा अजिबात पाहायला विसरू नका… कारण, तुमचा हा ‘झापुक झुपूक’ किंग त्या सिनेमाचा हिरो आहे रे बाबा…” अशा भावना यावेळी सूरजने व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : “सूरज चव्हाण हे नाव माझ्या आयुष्यात…”, सूरजला मिठी मारताच पंढरीनाथचे डोळे पाणावले, वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्यापासून सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजवर ( Suraj Chavan ) कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, छोटा पुढारी, वैभव चव्हाण या सगळ्या सहस्पर्धकांनी खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच पंढरीनाथ कांबळेने लाडक्या सूरजसाठी भावुक पोस्ट शेअर करत त्याला मिळणाऱ्या यशाचं, प्रेमाचं भरभरून कौतुक केलं आहे.