Bigg Boss Marathi 5 वे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हा सीझन ब्लॉकबस्टर ठरला असून, ७० दिवसांत हा शो संपणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी बिग बॉसने केली.

आता ६ ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा पार पडणार असून, सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार आहे. राखी सावंतने बिग बॉसच्या शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. आता तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून सूरज चव्हाणला मतदान करण्याची विनंती प्रेक्षकांना केली आहे.

“तो पाण्यासारखा निर्मळ आहे”

राखी सावंतने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. “मी बिग बॉस मराठीमध्ये गेले होते. मला असं वाटतंय की, सूरज चव्हाण जिंकणार आहे. तोच ट्रॉफी घेणार आहे. तर मला संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगायचं आहे की, सूरजलाच वोट करा. ज्या पद्धतीने तो बोलतो, ते मला आवडतं. तो पाण्यासारखा निर्मळ आहे. तो बिग बॉसमधून जिंकून यायला पाहिजे. त्यामुळे त्याला भरपूर वोट करा”, असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

राखी सावंत इन्स्टाग्राम

बिग बॉस मराठी ५ च्या घरात राखी सावंतने नुकतीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. आपल्या अनोख्या अंदाजाने ती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली. निक्की इतर स्पर्धकांशी ज्या पद्धतीने वागत होती, तिच्यासाठी राखी सावंत योग्य असल्याचे म्हणत तिला या शोमध्ये स्पर्धक म्हणून पाठवा, असे प्रेक्षक म्हणत असल्याचे पाहायला मिळाले. तिच्या घरात येण्याने प्रेक्षकांना आनंद झाल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: “मानवत मर्डर्सची कथा माझ्या गावाजवळच घडली”; बालपणीच्या भीतीदायक आठवणी सांगत मकरंद अनासपुरे म्हणाले, “आमच्या दैनंदिन जीवनावर… “

बिग बॉस मराठीचे पर्व येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता घरात निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर व अभिजीत चव्हाण हे स्पर्धक आहेत. यापैकी कोणता स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकणार आणि या पर्वाचे विजेतेपद पटकावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखी सावंत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात तिने अनोख्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले होते. ती फायनलिस्ट ठरली होती. बिग बॉस हिंदीच्या पहिल्या पर्वात आणि चौदाव्या पर्वातदेखील ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. याबरोबरच, राखी आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असते