Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : ‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने ६ डिसेंबरला अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली. मराठी कलाविश्वात त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. सुरुचीने पियुषशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? याबाबत अभिनेत्रीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

पियुषबरोबरचं नातं व लग्न करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सांगताना सुरुची म्हणाली, “मी प्रचंड आनंदी आहे. या क्षणाला मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करु शकत नाही. मला हे सगळंच स्वप्नवत वाटतंय. खरं सांगायचं झालं, तर माझ्या मनात एक वेगळीच जादुई भावना निर्माण झालेली आहे. पियुष माणूस म्हणून खूपच चांगला आहे. अतिशय भावनिक, काळजी घेणारा…मी खरंच भाग्यवान आहे म्हणून मला पियुषसारखा जोडीदार लाभला.”

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने भावाबरोबर केला ‘या’ ट्रेडिंग गाण्यावर डान्स, म्हणाली, “पहिल्यांदाच…”

सुरुची अडारकरने बुधवारी सकाळी (६डिसेंबर) इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या फोटोला अभिनेत्रीने “आनंददायी दिवस… PS आय लव्ह यू” असं कॅप्शन दिलं होतं. सध्या मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : “येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण…”, क्षिती जोग-हेमंत ढोमेच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण, अभिनेता म्हणाला, “लय खुळ्यागत…”

View this post on Instagram

A post shared by ??????? N ??????? (@suruchiadarkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुरुचीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने २००६ मध्ये सिनेविश्वात पदार्पण केलंय यानंतर छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केलं. ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे सुरुचीला एक वेगळी ओळख मिळाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुरुचीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय पियुष रानडे सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.