scorecardresearch

‘तारक मेहता…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार? मालिकेचे निर्माते असित कुमारांनी केला खुलासा, म्हणाले…

गेल्या सहा वर्षापासून दयाबेन मालिकेपासून लांब आहेत. त्या मालिकेत कधी परतणार यावर मालिकेचे निर्माते असित कुमारांनी उत्तर दिले आहे.

Taarak-Mehta-Ka-Ooltah-Chashmah
तारक मेहेता का उलटा चष्मा सिरिअलमध्ये दयाबेन परतणार?

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, चंपकलाला, तारक मेहता ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ६ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांना अनेकदा दया बेनच्या शोमध्ये पुनरागमनाबद्दल विचारण्यात येत आहे. आता या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनीच दयाबेन शोमध्ये कधी परतणार याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- Video: …अन् खासदार सुजय विखेंबरोबर थिरकला गौरव मोरे, व्हिडीओ तुफान व्हायरल

हेही वाचा- “तुझं सगळ्यात मोठं खोटं…” ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट होणार? पत्नीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

दयाबेनची भुमिका साकारणाऱ्या दिशा वकानी शोमध्ये परतण्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देऊन थकलो असल्याचे असित कुमार मोदी सांगतात. असित म्हणाले, ‘मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांचे प्रेम मिळणे सोपे नसते. लोकांनी आपल्याला खूप प्रेम दिले आहे, त्यामुळे आपल्याला मेहनत करावी लागेल. दिशा वाकाणीची जागा घेणे सोपे नाही. यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. मला स्वतः या शोमध्ये मूळ दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणीला परत आणायचे आहे. दिशा माझ्या बहिणीसारखी आहे. तिला सध्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. जर तिला परत यायचे नसेल तर मी तिला जबरदस्ती करू शकत नाही.

हेही वाचा- हनिमूनसाठी गेलेल्या टीव्ही अभिनेत्रीने खाल्ली तब्बल १८०० रुपयांची मॅगी, पती फोटो शेअर करत म्हणाला…

तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते शोसाठी नवीन दया भाभीच्या शोधात आहेत. मात्र, दिशा वाकाणीसारखी व्यक्तिरेखा शोधणे हे एक मोठे आव्हान आहे. शोमध्ये दयाबेनने तिच्या शैलीने लोकांना प्रभावित केले. त्यामुळे दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणे सोपे नाही. मात्र, दयाबेन लवकरच परतणार असल्याचे शोच्या निर्मात्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:07 IST

संबंधित बातम्या