‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षक आजही आवडीने पाहतात. या मालिकेतील कलाकारांना तर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेची क्रेझ अजूनही काही कमी झालेली नाही. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा चाहता आहे. या मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यात नेमके कसे आहेत? हे जाणून घेण्यात तर प्रत्येकाला रस असतो. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांच्या खऱ्या आयुष्याबाबत मध्यंतरी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

दिलीप यांच्याकडे आलिशान बंगला, महागड्या गाड्या आहेत अशा विविध चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात. पण या चर्चांमध्ये नेमकं किती तथ्य आहे याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे. ‘बॉम्बे जर्नी’ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्याबाबत भाष्य केलं. शिवाय त्यांच्या लाइफस्टाइलबाबत सतत होणाऱ्या चर्चांवरही त्यांनी आपलं मत मांडलं.

आणखी वाचा – भावाच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, भावूक होत म्हणाली…

दिलीप म्हणाले, “लक्ष वेधून घेण्यासाठी अलिकडे लोक काहीही लिहितात. माझ्याबाबत विविध गोष्टी बोलल्या जात आहेत. माझ्याजवळ ऑडी क्यू ७ आहे. मलाही सांगा माझ्याकडे असणारी ही गाडी नेमकी कुठे आहे? म्हणजे मीसुद्धा या महागड्या गाडीमधून फिरेन. शिवाय मुबंईमध्ये स्विमिंग पूल असलेल्या घरामध्ये मी राहतो असंही लिहिण्यात आलं होतं. जर मुंबईमध्ये स्विमिंग पूल असलेलं घर असेल तर यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नाही”.

आणखी वाचा – सुदीप्तो सेन यांना ‘द केरला स्टोरी’च्या सिक्वेलची ऑफर, दुसऱ्या भागाच्या कथेबद्दल खुलासा करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलीप यांच्या प्रॉपर्टीबाबत सतत होणाऱ्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं आता समोर आलं आहे. शिवाय २००७मध्ये दिलीप यांच्याकडे काहीच काम नव्हतं. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. घरखर्च चालवणंही त्यांच्यासाठी कठीण झालं होतं. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दिलीप यांना काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेनंतरच त्यांचं नशिब बदललं.