सध्या मालिकांसाठी टीआरपी हा अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. मालिकेला चांगला टीआरपी असेल तर ती मालिका बरेच वर्ष सुरू ठेवली जाते. पण मालिकेला कमी टीआरपी असेल तर ती अचानक बंद करण्याचा निर्णय वाहिन्यांकडून घेतला जातो. गेल्या काही महिन्यांपासून अशा अनेक मालिका ऑफ एअर झाल्या आहेत, ज्याचं कारण आहे कमी टीआरपी. दर आठवड्याला मालिकांचे टीआरपी रिपोर्ट येतात. यामध्येही दोन प्रकारचे रिपोर्ट असतात एक म्हणजे ऑनलाइन टीआरपी रिपोर्ट आणि दुसरा टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्ट. आता मागील आठवड्याचा ऑनलाइन टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात मुक्ता-सागरची जोडी सायली-अर्जुनपेक्षा वरचढ झालेली पाहायला मिळत आहे.

‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर ऑनलाइन टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका वर्षभरापासून ऑनलाइन व टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्टमध्ये पहिल्या स्थानावर ठाण मांडून आहे. पण मागील आठवड्याचा ऑनलाइन टीआरपी रिपोर्टमध्ये हे चित्र बदललं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ‘ठरलं तर मग’ला मागे टाकून पहिल्या स्थानावर आली आहे.

हेही वाचा – Video: “शेरास सव्वाशेर”, कला-अद्वैतच्या भन्नाट उखाण्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, पाहा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा प्रोमो

मागील आठवड्याचा ऑनलाइन टीआरपी रिपोर्टमध्ये तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला ३९.५ रेटिंग मिळाले आहे. तर ‘ठरलं तर मग’ या मालिकेला ३९.१ रेटिंग मिळाले असून दुसऱ्या स्थानावर ही मालिका आहे. तसेच तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या स्थानावर अनुक्रमे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘मुरांबा’ या मालिका आहेत.

टॉप-१० मालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१) प्रेमाची गोष्ट – ३९.५ रेटिंग
२) ठरलं तर मग – ३९.१ रेटिंग
३) लक्ष्मीच्या पाऊलांनी – ३६.२ रेटिंग
४) सुख म्हणजे नक्की काय असतं – ३४.२ रेटिंग
५) मुरांबा – ३३.० रेटिंग
६) आई कुठे काय करते – ३२.९ रेटिंग
७) मन धागा धागा जोडते नवा – २९.८ रेटिंग
८) तुला शिकवीन चांगला धडा – २९.६ रेटिंग
९) शुभविवाह – २९.१ रेटिंग
१०) तुझेच मी गीत गात आहे – २८.६ रेटिंग