मराठी मालिकाविश्वातील लाडकी मुलगी, सून म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्रीने आजवर साकारलेल्या मुलीची, सूनेची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या आहेत. मग ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील जान्हवी असो किंवा ‘अग्गंबाई सासूबाई’मधली शुभ्रा, तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

तेजश्रीने आपल्या सहसुंदर अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या तिची सुरू असलेली मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तेजश्रीच्या या मालिकेचा टीआरपी देखील अव्वल स्थानावर आहे. अशातच तेजश्रीने आपल्या व्यग्र वेळेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या भाचीबरोबर वेळ घालवला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – रिंकू राजगुरुने कुटुंबासह पाहिलं ‘नियम व अटी लागू’ नाटक, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, “वचवच, माज, नखरे काही नाही…”

निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे ही एक पायलट आहे. गेल्यावर्षी निवेदिता यांनी अदितीचा विमानात मराठीत उद्घोषणा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. अदितीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विमानात मराठीत उद्घोषणा ऐकल्यामुळे सर्वजण अदितीचं कौतुक करत होते.

याच अदितीबरोबर शुक्रवारी रात्री तेजश्रीने तिचा वेळ घालवला. यावेळी दोघींनी खूप एन्जॉय केलं. मस्त पिझ्झा वगैरेवर ताव मारला. याचा व्हिडीओ अदितीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

तेजश्री व अदितीच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी लिहिलं आहे, “दोघींनी खूप एन्जॉय करा…तुम्ही दोघीही माझ्या आवडत्या आहात.” तसेच निवेदिता सराफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, “माझ्या दोन आवडत्या मुली…खूप छान.”

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचे ‘नाच गं घुमा’वर रील करण्यासाठी अथक प्रयत्न, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, यावर्षाच्या सुरुवातीला तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. माधुरी दीक्षित निर्मिती असलेल्या ‘पंचक’ या चित्रपटात तेजश्री झळकली. त्यानंतर ‘लोकशाही’ या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली.