मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. तर आता मोठ्या कालावधीनंतर तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

नुकतीच तेजश्रीची प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरु झाली. यामध्ये ती एका सक्षम महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता राज हंसनाळे प्रमुख भूमिका साकारत आहे. आता तिच्या या भूमिकेवर तिच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया केली आहे.

आणखी वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून…

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेच्या पहिल्या भागाचं एक स्पेशल स्क्रीनिंग झालं. यावेळी तेजश्रीचे आई-बाबाही आले होते. एक मुलाखतीत लेकीचं काम बघून ते म्हणाले, “तेजश्री मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर दिसत आहे याचा खूप आनंद होतोय. आम्हाला पहिला भाग खूप आवडला. सगळ्या कलाकारांची कामं, त्यांच्या एंट्री खूप मस्त झाल्या आहेत. ही मालिका प्रेक्षक आवडीने बघतील याची आम्हाला खात्री आहे.” तर तिची आई म्हणाली, “आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.तिची ‘अग्गबाई सासूबाईमधली तिची भूमिका फार आवडली. माझं असं नेहमी म्हणणं असतं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, सहन करत राहू नये. ती तिची भूमिका तशी होती. तर या मालिकेतही पुढे तशीच होताना दिसेल. आजच तिचं हे काम पाहिलं आहे आणि आवडलं आहे मला. बघू आता मालिकेत पुढे काय होतंय.”

हेही वाचा : “…म्हणून दोन-अडीच वर्षं छोट्या पडद्यापासून लांब राहिले,” तेजश्री प्रधानने सांगितलं कारण

तर तेजश्रीचे चाहते तिला बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मालिकेत पाहून खूप खुश झाले आहेत. सोशल मिडियावरून त्यांना या मालिकेतील तिचं काम आवडलं असून पुढील भागांसाठी ते खूप उत्सुक असल्याचं सांगत आहेत.