अभिनेत्री तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची मध्यवर्ती भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील मुक्ता-सागरची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसेच मालिकेतील इतर पात्र सई, माधवी, इंद्रा, पुरुषोत्तम गोखले, जयंत कोळी, लकी, मिहिर, मिहिका, स्वाती घराघरात पोहोचले आहेत. सध्या मालिकेत मुक्ता-सागरच्या लग्नाची धामधामू सुरू आहे. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा आहे. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागामध्ये गायब असलेल्या सागरला मिहिर साखरपुड्यासाठी घेऊन येतो. तेव्हा खोळंबलेल्या सगळ्या जणांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण मिहिर पोलिसांना शरण गेलेला असतो तो अचानक कसा बाहेर पडतो? हे पाहून सगळ्यांना प्रश्न पडतो. पण लकीने नवा डाव रचून त्याच्या मित्राला पैसे देऊन मिहिकाच्या प्रकरणातील गुन्हा कबुल करायला सांगितलं असतं. त्यामुळे मिहिरची निर्दोष सुटका होते. त्यानंतर मुक्ता-सागरचा निर्विघ्नपणे साखरपुडा पार पडतो. आता पुढच्या भागात गोखले-कोळी कुटुंब देणीघेणी, लग्नाची तारीख ठरवताना दिसणार आहेत.

हेही वाचा – …यामुळे प्रसाद जवादे व अमृता देशमुखमध्ये झालं होतं पहिलं भांडणं, अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली…

मुक्ता-सागरच्या मेहंदी सोहळ्याचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एक भावुक क्षण पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये, मेहंदी सोहळ्यादरम्यान मुक्ताजवळ सई येते. तेव्हा मुक्ता म्हणते, “सई काय झालंय?” यावर सई म्हणते, “आई…मुक्ता आई..” हे ऐकून मुक्ता भावुक होऊन म्हणते, “तू मला आई म्हणालीस?” सई म्हणते, “तू माझ्या पप्पाशी लग्न करणार ना…मग तू माझी आई…” हा क्षण पाहून मुक्ताच्या आईसह सर्वजण भावुक होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. “खूपच सुंदर कथानक आहे…तेजश्री प्रधान आणि शुभांगी ताई चार चांद आहेत मालिकेत”, “खूपच छान सीन आहे”, “बेस्ट”, “छान वाटलं ऐकून हे”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.