मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. तर आता ती मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. गेली अडीच तीन वर्षाची छोट्या पडद्यापासून का दूर होती याचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे.

‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेने तेजश्री प्रधानला वेगळी ओळख मिळवून दिली. तर याआधी शेवटची ती ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. ही मालिका संपल्यानंतर तेजश्री जवळपास अडीच ते तीन वर्ष कोणत्याही मालिकेमध्ये दिसली नाही. तर आता मोठ्या कालावधीनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसेल. छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचं काय कारण होतं हे तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून…

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजश्री म्हणाली, “मालिका संपल्यावर दोन-सव्वा दोन वर्ष मी ब्रेक घेते आणि त्या कालावधीत मी फिल्म इंडस्ट्री एक्सप्लोअर करते. वेब शो म्हणा, शॉर्ट फिल्म म्हणा किंवा काहीतरी लिखाणाचं काम करते. कारण मला स्वतःसाठी आणि प्रेक्षकांसाठीही तो वेळ देणं गरजेचं वाटतं. कारण वाट बघितल्यावर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळते तेव्हा ती आणखी खास असते. या गेल्या दोन-सव्वा दोन वर्षांमध्ये मी काही हिंदी, काही मराठी चित्रपट केले आणि ही मालिका सुरू झाल्यानंतर ते चित्रपटही तुमच्या भेटीला येतील.”

हेही वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता दिसते ‘अशी’, तेजश्रीबरोबरचा फोटो पोस्ट करत मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले…

दरम्यान, तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवीन मालिका ४ सप्टेंबरपासून स्टार प्रवाहवरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेत तिच्याबरोबर अभिनेता राज हंसनाळे प्रमुख भूमिकेत दिसेल.