तेजस्वी प्रकाश टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती ‘नागिन’ मालिकेमुळे चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या ती अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तेजस्वीचा मुंबईत मोठी झाली व तिचं शिक्षणही मुंबईत झालं. तिने इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलंय. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांतील आठवणी सांगितल्या.

तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचा ‘तो’ रोमँटिक डान्स पाहून संतापले नेटकरी, व्हिडीओ व्हायरल

तेजस्वी प्रकाशने तिच्या कॉलेजमधील परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता, याबाबत खुलासा केला. तिने एकदा प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी २०,००० रुपये दिले होते. तिने सांगितले की ती चांगली विद्यार्थिनी नव्हती, परंतु पासिंगसाठी पर्यायी मार्ग शोधण्यात ती चांगली होती. “मी कधीच प्रश्नपत्रिका विकत घेतल्या नाहीत आणि ते शक्य आहे असे मला वाटत नाही. मला माहीत आहे, कारण मी त्यासाठी प्रयत्न केला होता,” असे तिने एका मुलाखतीत सांगितले.

‘ब्रूट इंडिया’शी बोलताना तेजस्वीने तिच्या विद्यार्थीदशेबद्दल खुलासा केला आणि म्हणाली की, तिला ती कधीही अभिनेत्री बनेल असं वाटलं नव्हतं. दिसायला चांगली असल्याने तिने एअर होस्टेस बनण्याचा विचार केला होता. पण, तेजस्वी म्हणाली “मी सौंदर्य स्पर्धा जिंकल्यावर सर्व काही बदलले. मी माझी पहिलीच ऑडिशन क्लिअर केली होती आणि मला दररोज ८ हजार रुपये ऑफर करण्यात आले होते, जे १७ वर्षांच्या मुलासाठी खूप पैसे होते. पण मला टेलिव्हिजन इंडस्ट्रीची काहीच कल्पना नव्हती, कारण मी टीव्ही शो पाहत नव्हती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास तेजस्वी तिच्या आगामी मराठी चित्रपट ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टीने केली आहे.