कलाकार आणि त्यांची कार आणि बाईक यांची क्रेझ ही आपल्याला नवीन नाही. अनेक आघाडीचे कलाकार त्यांच्या बाईक वरून मुंबईची सैर करताना दिसतात. करत असताना आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून जॅकेट, हेल्मेट, ग्लोजही ते घालतात. आता हिंदी सृष्टीतील एका आघाडीच्या अभिनेत्रीने बाईक राईडचा आनंद घेतला.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिव्यांका त्रिपाठी आहे. दिव्यांकाला ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेने ओळख दिली. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती तिच्या चाहत्यांची शेअर करत असते. आता नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यात ती मुंबईच्या रस्त्यांवर बाईक चालवताना दिसत आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’ची वाहवा होत असली तरी वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये ‘हा’ भारतीय चित्रपट आहे पहिल्या स्थानावर

तिने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यात ती एका महागड्या बाईकवर काळ्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची जीन्स, बाईकर बुट्स आणि डोक्यावर हेल्मेट घालून बाईक चालवताना दिसते. या तिच्याबरोबर तिचा नवरा विवेक दहियाही दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत दिव्यांकाने लिहिलं, “एकत्र बाईक चालवा, एकत्र राहा.”

हेही वाचा : मी एक्स बॉयफ्रेंडवर केली होती काळी जादू; अभिनेत्री दिव्यांकाचा धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेमध्ये संस्कारी सुनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या प्रियांकाचा हा डॅशिंग अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून या पोस्टवर कमेंट करत विविध प्रतिक्रिया देत आहेत.