‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरून गैरसमज निर्माण झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहेत. चैतन्य अर्जुन-सायलीच्या लग्नाचं सत्य चुकून साक्षी शिखरेला सांगतो. साक्षी मोठ्या हुशारीने या सगळ्या गोष्टी प्रियाला जाऊन सांगते. दोघांच्या लग्नाची खरी गोष्ट समजताच प्रिया भलतीच आनंदी होती आणि ती घडला प्रकार पूर्णा आजीला जाऊन सांगते.

पूर्णा आजी सुभेदारांच्या घरात सायलीला देवासमोर उभं करून लग्नासंदर्भात काही प्रश्न विचारते. या सगळ्याची सायलीने दिलेली उत्तर पाहून प्रिया पुन्हा एकदा तोंडावर पडते. एकीकडे प्रिया-अस्मिताचा डाव फसतो परंतु, दुसरीकडे मात्र अर्जुन-सायलीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरून गैरसमज होतात. याबाबत सायलीने तिची जवळची मैत्रीण कुसुमकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : Video : “बाबा गेले अन् आईने त्यांचा फोटो जवळ घेऊन…”, ‘तो’ प्रसंग सांगताना कुशल बद्रिकेला अश्रू अनावर

सायली कुसुमसमोर तिच्या प्रेमाची कबुली देते आणि खूप रडते. तसेच “अर्जुन सरांचं माझ्यावर प्रेम नाही” असं देखील ती कुसुमला सांगते. पण, दुसरीकडे सायलीचा फोटो पाहत अर्जुन “मिसेस सायली मला तुम्ही बायको म्हणून हव्या आहात पण, तुमचं माझ्यावर प्रेम नाही.” असं म्हणत असतो. एकंदर दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं परंतु, हे दोघेही कोणत्याही प्रकारे एकमेकांसमोर प्रेमाबद्दल काहीच बोलत नाही. सायलीने ठरल्यानुसार घरातून निघून जावं यासाठी अर्जुन तिच्याशी मुद्दाम वाईट वागू लागतो.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंच्या पत्नीला पाहिलंत का? वाढदिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले, “तुझ्याविना माझं सतत…”

अखेर सायली कॅलेंडरमध्ये त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे दिवस मोजू लागते. यामध्ये आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लग्न संपायला शेवटचे दोन दिवस बाकी असल्याचं ती अर्जुनला सांगते. सायली त्यांच्या खोलीबाहेर पडणार इतक्यात अर्जुन तिला अडवायला जातो आणि त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पायाला दुखापत झाल्याने सायली लगेच मागे फिरते आणि अर्जुनच्या पायाला मलम लावून देते. तसेच “आता मी शेवटचं मलम लावून देतेय यापुढे तुम्हाला मलम लावून कोण देणार सर… मी इथे नसेन” असं ती अर्जुनला सांगते.

हेही वाचा : १७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

View this post on Instagram

A post shared by SerialJatra (@serialjatra)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन काहीसा नाराज होतो. त्याला काय बोलावं हे सुद्धा समजत नसतं. अशातच आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी राहिलेले असताना पुढे काय करायचं हा विचार अर्जुनच्या डोक्यात चालू होतो. आता सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार की, दोघं पुन्हा एकत्र येणार? याचा उलगडा प्रेक्षकांना येत्या काही भागातच होईल.