Tharala Tar Mag Monika Dabade New Car : ‘ठरलं तर मग’ मालिका आणि यामध्ये काम करणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. सायली, अर्जुन, पूर्णा आजी, चैतन्य, प्रिया, अस्मिता अशा सगळ्या व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबडेने चाहत्यांना गुडन्यूज देत, वैयक्तिक आयुष्यात ती लवकरच आई होणार आहे असं जाहीर केलं होतं. आता मोनिकाने तिच्या सर्व चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केल्याचं सांगितलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत मोनिका ( Tharala Tar Mag ) अर्जुनच्या बहिणीचं म्हणजेच अस्मिता हे पात्र साकारत आहे. अस्मिता नेहमीच सायली-अर्जुनविरोधात कुरापती करत असते. मोनिकाची भूमिका नकारात्मक असली तरीही ‘अस्मिता’ या तिच्या व्यक्तिरेखेशिवाय सुभेदारांचं घर नेहमीच अपूर्ण वाटतं. पण, ऑफस्क्रीन मोनिकाचं सगळ्या कलाकारांशी एकदम घट्ट बॉण्डिंग आहे. अभिनेत्रीच्या युट्यूब व्हिडीओमध्ये अनेकदा सेटवर केली जाणारी पडद्यामागची धमाल सुद्धा पाहायला मिळते. आज नवीन गाडी घेतल्याबद्दल मालिकेतील सहकलाकारांनी सुद्धा मोनिकावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Video : “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”

मोनिकावर अभिनंदनाचा वर्षाव

‘स्वप्नपूर्ती आणि तयारी’ असं कॅप्शन देत मोनिकाने ( Tharala Tar Mag ) नव्या गाडीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नव्या गाडीबरोबर मोनिकासह तिचा पती चिन्मय कुलकर्णी यानेही छानसे फोटो काढले आहेत. शेअर केलेल्या पोस्टला दिलेल्या हॅशटॅगवरुन अभिनेत्रीने टाटा Nexon ही गाडी खरेदी केल्याचं स्पष्ट होत आहे.

सध्या मराठी कलाविश्वातून मोनिकावर या नव्या गाडीसाठी अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत खांडकेकर, अमित भानुशाली, शर्वरी जोग, रेश्मा शिंदे, गिरीजा प्रभू, जुई गडकरी या सगळ्यांनी कमेंट्स करत मोनिकाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

View this post on Instagram

A post shared by Monika Dabade (@mostly_monika)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोनिकाच्या ( Tharala Tar Mag ) वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, मोनिका खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच फोटो शेअर करत याबाबतची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. एप्रिल २०२५ मध्ये बाळाचं स्वागत करणार असल्याचं मोनिकाने सांगितलं आहे.