‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीच्या खोट्या गरोदरपणाचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली-अर्जुनने एकमेकांशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्याने ती गरोदर असल्याचं डॉक्टरांनी खोटं कसं काय सांगितलं? याबद्दल सायली-अर्जुन दोघेही चिंता व्यक्त करत असतात. एकीकडे सायली-अर्जुन चिंतेत असताना दुसरीकडे सुभेदार कुटुंबीय आणि कल्पना खूपच आनंदात असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : मराठी अभिनेत्याचं नशीब उजळलं! बॉलीवूडच्या ‘शेरशाह’बरोबर सीरिजमध्ये झळकणार, अनुभव सांगत म्हणाला…

सायली-अर्जुन लग्नाचं खोटं नाटक करत असल्याचं फक्त चैतन्य आणि कुसुमला माहीत असतं. अशा परिस्थितीत सायली गरोदर असल्याचे खोटे रिपोर्ट्स आल्यामुळे अर्जुनला पुढे काय करायचं याचा मार्ग सापडत नाही. घरातल्यांच्या आनंदासाठी काही दिवस हे सहन करा असं तो सायलीला सांगतो. अर्जुन-सायलीचा संवाद चोरून ऐकल्यामुळे अस्मिताला दोघांवर संशय आलेला असतो. त्यामुळे सायलीला त्रास देण्यासाठी अस्मिता प्रियाच्या साथीने नवा डाव रचते.

हेही वाचा : Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत येणार नवं वळणं; मुक्ता-सागरच्या मैत्रीच्या नात्याची होणार सुरुवात

अस्मिताने सायलीच्या ताकात औषध मिसळल्याने घरातल्यांसमोर तिला चक्कर, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागतो. यामुळे सुभेदार कुटुंबीयांच्या मनात सायली गरोदर असल्याचा संशय निर्माण होतो. यामुळेच कल्पना दोघांनाही डॉक्टरांकडे पाठवते. नर्सला पैसे देऊन प्रिया सायलीचे खोटे रिपोर्ट्स बनवून घेते आणि तिच्या खोट्या गरोदरपणाचा कट रचते.

हेही वाचा : शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर; ‘डंकी’च्या पहिल्या टीझरबद्दल नवीन अपडेट, ‘या’ दिवशी येणार टीझर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायलीच्या खोट्या गरोदरपणाचा कट रचून प्रिया-अस्मिताला दोघांच्याही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड करायचं आहे. त्यामुळे प्रियाने निर्माण केलेल्या या नव्या समस्येतून सायली-अर्जुन कसे मार्ग काढणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.