Tharala Tar Mag Special Episode : ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मालिकेत सायलीच्या खोट्या गरोदरपणाचा सीक्वेन्स चालू आहे. अस्मिता व प्रिया दोघी मिळून अर्जुन-सायलीच्या खोट्या लग्नाचं सत्य उघड करण्यासाठी सायलीचे हॉस्पिटलमधील रिपोर्ट्स बदलून घेतात. यामुळे समस्त सुभेदारांच्या मनात सायली गरोदर असल्याचा गैरसमज निर्माण होतो.

हेही वाचा : “नग्न झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का?” विचारणाऱ्याला मिताली मयेकरचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “बघा…”

एकीकडे सूनबाई गरोदर असल्याने कल्पना आनंदी होते, तर चुकीचे रिपोर्ट्स कसे काय आले? हा विचार करून सायली-अर्जुन अस्वस्थ झालेले असतात. सायलीचा छळ करण्यासाठी आणि अर्जुन-सायलीचं लग्न मोडण्यासाठी अस्मिता-प्रिया हा नवा डाव रचतात असं प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळालं.

हेही वाचा : “रात्री दीड-पावणे दोन वाजता…”, ‘असे’ शूट होतात नारकर जोडप्याचे रिल्स, खुलासा करत म्हणाले…

गरोदरपणाचा विषय आणखी वाढत गेला, तर पुढे काय होणार? असा विचार सायली-अर्जुन करत असतात. तेवढ्यात कल्पना दोघांच्या खोलीत येऊन अर्जुनच्या बालपणीचा फोटो आपण तुमच्या खोलीत लावूया असं सांगते. घरच्यांचा आनंद पाहून सायलीला आणखी वाईट वाटतं आणि तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. परंतु, आता लवकरच सायलीचं सत्य घरच्यांसमोर उघड होणार आहे.

हेही वाचा : Video: “मी ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा…”, अविनाश नारकरांनी सांगितली ‘ती’ आठवण, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ठरलं तर मग’च्या विशेष भागात कल्पना सायली-अर्जुनला सरप्राईज देणार आहे. सुभेदार कुटुंबीय मिळून दोघांसाठी छोट्याशा पार्टीचं आयोजन करणार आहेत असं विशेष भागाच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या पार्टीत कल्पनासह घरातील सगळे सायली गरोदर असल्याचा आनंद साजरा करत असतात. यावेळी सायलीला आपण सर्वांची फसवणूक करत आहोत याची जाणीव होते आणि ती मोठ्याने ओरडून मी गरोदर नाही आहे असं सर्वांना सांगते. दरम्यान, या विशेष भागाचं प्रेक्षपण येत्या रविवारी म्हणजेच ५ नोव्हेंबरला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे.