मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांना सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यातही अभिनेत्रींना त्यांचं वय आणि कपड्यांवरून वारंवार ट्रोल केलं जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये असाच काहीसा अनुभव अभिनेत्री मिताली मयेकरला देखील आला आहे. मिताली आणि सिद्धार्थ विविध देशांना भेट देऊन त्याचे फोटो व काही आठवणी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. अभिनेत्रीच्या अशाच एका फोटोवर नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केली आहे. फोटोवरची कमेंट पाहून मितालीने संबंधित ट्रोलरला चांगलंच सुनावलं आहे. हेही वाचा : “रात्री दीड-पावणे दोन वाजता…”, ‘असे’ शूट होतात नारकर जोडप्याचे रिल्स, खुलासा करत म्हणाले… मिताली अलीकडेच तिच्या काही मैत्रिणींबरोबर इंडोनेशियामधील बाली हे शहर फिरायला गेली होती. इंडोनेशियामध्ये असलेल्या पिंक बीचवर अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. या फोटोला अभिनेत्रीने "पिंक बीच…" असं कॅप्शन दिलं आहे. एकीकडे मितालीच्या या फोटोशूटचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. परंतु, दुसरीकडे एका नेटकऱ्याने मितालीच्या फोटोवर विचित्र कमेंट केली आहे. हेही वाचा : Video: “मी ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा…”, अविनाश नारकरांनी सांगितली ‘ती’ आठवण, म्हणाले… मितालीने शेअर केलेल्या पिंक बीचच्या फोटोवर एका नेटकऱ्याने "नागडं(नग्न) झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का?" असा विचित्र प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीने यावर, "माहिती नाही बुवा! बघा प्रयत्न करून" असं सडेतोड उत्तर दिलं आहे. मितालीने दिलेल्या उत्तराचं तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुक केलं आहे. यापूर्वी ऐश्वर्या नारकर, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी देखील अशीच रोखठोक उत्तरं देत ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. https://www.instagram.com/p/CzDTVx5twDW/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा : “लोक इतके अमानवी अन्…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांवर संतापल्या काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत; म्हणाल्या, “स्वतःच्या आयुष्यात…” मिताली मयेकरने ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर दरम्यान, मिताली मयेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. छोट्या पडद्यावरील ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने २०२१ मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर लग्न केलं. दोघेही लग्नानंतर अनेक आंतरराष्ट्रीय ट्रिपला जात असतात.