स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने मागील आठवड्यातही TRP च्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. जुई गडकरीने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’, तर अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारलं आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट लग्न, मालिकेत येणारी रंजक वळणं यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

हेही वाचा : “मी प्रचंड दडपणात असताना दीपिकाने…”, वैभव तत्त्ववादीने सांगितला ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवरील किस्सा

ऑनलाइन TRP ची यादी सोशल मीडियावर शेअर करत जुई गडकरीने या पोस्टला ‘नंबर १’ असं कॅप्शन दिलं आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने स्थान मिळवलं आहे. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने अवघ्या एका महिन्यात टॉप ५ मालिकांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा : वयावरून ट्रोल करणाऱ्यांसाठी ऐश्वर्या नारकरांची पोस्ट; ‘या’ गाण्यावर बनवला नवा व्हिडीओ; म्हणाल्या, “तुमचं वय…”

‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकांनंतर या यादीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानी ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांचा समावेश होतो. विशेष म्हणजे, मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपी यादीत पहिल्या ८ स्थानावर स्टार प्रवाहच्या मालिका आहेत. यानंतर ९ व्या क्रमांकावर ‘झी मराठी’च्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा : “कुणी हस्तमैथुन, लैंगिक शिक्षणावर चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे का?” अक्षय कुमारचा सवाल; म्हणाला, “दुर्दैवाने मुलांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
jui gadkari
जुई गडकरी

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या गुंडांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेली सायली हळुहळू सावरतेय असा सीक्वेन्स सुरु आहे. आता आगामी भागात पूर्णा आजीमुळे अर्जुन-सायली कुटुंबीयांसमोर पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा विशेष भाग येत्या १५ ऑक्टोबरला प्रसारित केला जाणार आहे.