‘ठरलं तर मग’ मालिका सुरु होऊन आज १ वर्ष पूर्ण झालेलं आहे. सध्या या मालिकेत सायली अर्जुनला वैवाहित आयुष्यातील जोडीदाराचं महत्त्व पटवून देत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. आता येत्या भागात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार? जाणून घेऊयात…

सायली तिचा लहान दीर अश्विनची समजूत काढण्यासाठी खास प्लॅन बनवते. कल्पना, पूर्णाआजी यांनी सांगितलेल्या अनुभवांमुळे अर्जुनसह अश्विनचा वैवाहिक आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. अश्विनचं आयुष्य सुधारण्यासाठी आणि अर्जुनच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी सायली हे सगळे प्रयत्न करत असल्याचं अखेर अर्जुनच्या लक्षात येतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही सायली आपल्या कुटुंबाला व्यवस्थित सावरतेय हे पाहून अर्जुन भारावून जातो आणि तिला काहीतरी सरप्राईज द्यायचं असं ठरवतो.

हेही वाचा : “मैत्री या शब्दाचा अर्थ…”, सोनाली खरेच्या वाढदिवशी अमृता खानविलकरची खास पोस्ट; म्हणाली, “माझ्या वेडेपणाला…”

अर्जुनने दिवाळीच्या पाडव्याला मधूभाऊंना घरी आणून सायलीला सरप्राईज दिलेलं असतं. याची परतफेड म्हणून सायली अर्जुनसाठी डिनर डेटचं आयोजन करते. परंतु, अश्विनने अचानक आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे सुभेदारांच्या घरातील वातावरण बिघडतं. सायलीने या सगळ्या दु:खात अश्विनसह कुटुंबाला योग्यरित्या सांभाळल्याने अर्जुन तिला सरप्राईज देत तिचे आभार मानायचे असं ठरवतो. असं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “मला सिनेमात घेतलं की…”, शिवानी सुर्वेने ‘झिम्मा २’साठी हेमंत ढोमेला पाठवलेली जन्मपत्रिका, किस्सा सांगत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by SerialJatra (@serialjatra)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुन त्यांच्या खोलीत सर्वत्र धन्यवाद लिहिलेले कार्ड्स ठेवतो. अर्जुन आपले आभार मानतोय हे पाहून सायली भलतीच आनंदी होते. तसेच यापुढे असा चुकीचा विचार करु नका असा सल्ला सायली अर्जुनला देते. अर्जुनने दिलेल्या या नव्या सरप्राईजमुळे आणि अश्विन प्रकरणामुळे सायली-अर्जुनच्या नात्याला एक वेगळं आलेलं आहे. आता या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात केव्हा होणार? या ट्रॅकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.