मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून जुई गडकरी घराघरात पोहोचली. या मालिकेतील जुईने साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना चांगलीच भावली. पुढचं पाऊल या मालिकेनं फक्त दोन-तीन वर्षं नाही तर पाच-सहा वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेपूर्वीही जुई काही मालिकांमध्ये झळकली होती. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करीत असून, तिच्या या मालिकेनंही अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

हेही वाचा – समीर वानखेडे यांना क्रांती रेडकर नाही तर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आवडते

अभिनेत्री जुई गडकरीनं ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका साकारली आहे. ज्याप्रमाणे जुईची कल्याणी या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती, त्याचप्रमाणे तिच्या सायली या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करीत आहेत. दरम्यान, नुकतीच जुई ‘अल्ट्रा मराठी बज’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलवरील ‘रॅपिड फायर’ खेळात सहभागी झाली होती. यावेळी तिला पावसात उभं राहून काय खायला आवडतं?, असं विचारण्यात आलं होतं. त्या वेळेस जुईनं मका आणि कर्जतचा सट्टू वडापाव खायला आवडतं, असं सांगितलं. तसंच तिनं पावसाळ्यातील एक किस्सासुद्धा सांगितला.

जुई म्हणाली, “मला पावसाळ्यात मका खायला खूप आवडतो आणि कर्जतला असेल, तर वडापाव खायला आवडतो. मी गेली दीड-दोन वर्षं वडापाव खाल्लाच नाही. पूर्वी मी आणि माझी कर्जतची मैत्रीण अनघा आम्ही दोघी रेनकोट घालायचो, छत्र्या घ्यायचो आणि घरातून निघायचो. आमच्याकडे सट्टू नावाचा वडापाववाला खूप प्रसिद्ध आहे. मग तिथला वडापाव घ्यायचो आणि नदीवरून चालत जायचो. मग हायवेवर जायचो. परत सट्टूकडे यायचो आणि दुसरा वडापाव घ्यायचो. पुन्हा मग तशीच दुसरी फेरी मारायचो आणि मग घरी जायचो. हे आमचं ठरलेलं असायचं. तुम्ही कर्जतमध्ये असाल, तर प्लीज सट्टूचा वडापाव खा. पावसाळ्यात कर्जतच्या वातावरणात तो वडापाव खायला खूप मज्जा येते.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतून आणखी एक एक्झिट; ‘या’ ज्येष्ठ कलाकाराच्या जागी दिसणार ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता

हेही वाचा – काजोलच्या ‘या’ व्हिडीओची मराठमोळ्या अभिनेत्रीला पडली भूरळ; म्हणाली, “ती खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जुई गडकरी मालिकांव्यतिरिक्त ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकली होती. या पर्वात तिच्याबरोबर ‘पुढचं पाऊल’मध्ये सोहमच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता आस्ताद काळेसुद्धा झळकला होता.