मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे जुई चर्चेचा विषय असते. सध्या तिची ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. या मालिकेत तिने साकारलेली सोज्वळ, साधी सायली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. जुईच्या कामाच चहूबाजूने कौतुक होतं आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतंच तिला आवडणाऱ्या जंक फूड्सविषयी सांगितलं आहे.

हेही वाचा – “आईचे दागिने, मैत्रिणीचे कपडे अन्…”, घराचा EMI भरण्यासाठी केतकी माटेगावकरने केली अशी बचत; म्हणाली…

जुई ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच मालिकेतील अपडेट देखील देत असते. आज तिने वेळ मिळाल्यामुळे इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांनी तिला विविध प्रश्न विचारले. तिच्या लग्नापासून ते तिच्याकडे कुठल्या गाड्या आहेत? असे बरेच प्रश्न चाहत्यांनी विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तर तिने दिली.

हेही वाचा – “तुझं लग्न कधी आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी म्हणाली, “पत्रिका…”

इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनमध्ये एका चाहत्याने जुईला “कोणतं जंक फूड आवडतं?” असं विचारलं. तेव्हा ती म्हणाली, “वडापाव. तो ही कर्जचा सट्टूचा वडापाव. त्यानंतर मला पिझ्झा आवडतो. विशेष म्हणजे रस्त्यावरील दुकानातील पिझ्झा खूप आवडतो. शिवाय बर्गर ही आवडतो.”

हेही वाचा – ‘बॉईज ४’ चित्रपटात ओंकार भोजने का नाही?; दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी केला खुलासा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जुईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर ती ‘वर्तुळ’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. मग जुई ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकली. या पर्वात तिच्याबरोबर ‘पुढचं पाऊल’मधील सोहमच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता आस्ताद काळेसुद्धा झळकला होता. ‘बिग बॉस’ नंतर काही काळ्याच्या विश्रांतीने जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे जबरदस्त पुनरागमन केलं.