अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका नेहमीच चर्चेत असते. सध्या मराठी मालिकाविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने ३०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. लवकरच या मालिकेला वर्ष देखील पूर्ण होती. तरीही मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या यादीत अजूनही अव्वल स्थानावर टिकून आहे. अशातच मालिकेतील कलाकारांनी सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरीला दिवाळी पाडव्याला एक खास गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे. ते खास गिफ्ट काय असणार आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – ‘नवरा कुठे गेला?’ नेटकरीच्या प्रश्नावर सोनाली कुलकर्णीने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाली….

नुकतंच जुई गडकरी आणि अमित भानुशालीने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अमितला दिवाळी पाडव्याला जुईला काय गिफ्ट देणार? असं विचारण्यात आलं. तेव्हा अमित म्हणाला, “मी एकट्याने नाही तर आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की, जुईला शादी डॉट कॉमच सब्सक्रिप्शन घेऊन द्यायचं.” यावर जुई हसते आणि म्हणते चालेलं.

हेही वाचा – भारदस्त आवाजाने महाराष्ट्राला थिरकायला लावणाऱ्या शिंदेशाहीचं उद्योग क्षेत्रात पाऊल; सुरू केला नवा पेट्रोल पंप

पुढे अमित जुईला आयुष्यभरासाठी कसा साथीदार पाहिजे? आणि अटी काय आहेत? याविषयी बोलता. तो म्हणतो, “एक म्हणजे तो शाकाहारी असायला पाहिजे. तो कांदा, लसूण खाणारा नकोय. तो मांजरप्रेमी पाहिजे. प्रवास करणं त्याला खूप आवडायला पाहिजे. शिवाय तो खवय्या असायला हवा. तसंच तो मिश्कील पाहिजे. तो खूप प्रेम करणारा पाहिजे. कारण ही खूप भावनाप्रधान आहे. तसंच त्याची देवावर नितांत श्रद्धा असायला हवी. लग्नानंतर देवदर्शन करूनच हनिमूनला जाणारा असायला पाहिजे.”

हेही वाचा – लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करताना अक्षरा-अधिपतीमध्ये नेमकं काय घडणार? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर जुईला विचारलं जातं की, रिर्टन गिफ्ट म्हणून तू काय देणार? यावर अभिनेत्री म्हणते की, “मी माझ्या लग्नाची पत्रिका देईन. कारण यांनी सगळं काही ठरवून ठेवलं आहे. माझं लग्न ठरल्यानंतर काय-काय करायचं, शूटिंगचं काम कशापद्धतीने करायचं, एवढंच नाहीतर गर्भवती राहिली तर काय करायचं, असं सगळं काही या लोकांनी ठरवलं आहे.”