‘द कपिल शर्मा शो’ फेम कॉमेडियन सुगंधा म‍िश्रा व संकेत भोसले लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकताच सुगंधाचा महाराष्ट्रीय पद्धतीत थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? मराठी मालिकाविश्वातील आहे लोकप्रिय खलनायिका

सुगंधा व संकेतचं लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं. २६ एप्रिल २०२१ला दोघं लग्नाच्या बेडीत अडकले आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. फगवाडा इथल्या क्लब कबाना या हॉटेलमध्ये त्यांचा लग्न सोहळा पार पडला होता. पण दोघांना लग्नाच्या ९ दिवसांतच पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या लागल्या होत्या. कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण लग्न सोहळ्यात कोव्हिड नियमांचं तंतोतंत पालन केल्याचा दावा दोघांच्या कुटूंबियांकडून करण्यात आला. या सर्व प्रकरणामुळे सुगंधा व संकेतचा लग्न सोहळा चांगलाच चर्चेत आला होता. लग्नाच्या दोन वर्षानंतर आता लवकरच दोघं आई-बाबा होणार आहेत.

१५ ऑक्टोबरला दोघांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली. तेव्हापासून सुगंधा व संकेत चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच सुगंधाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम महाराष्ट्रीयन पद्धतीत पार पडला. यावेळी ओटी भरण्यासह पूजाअर्चा असे बरेच महाराष्ट्रीयन परंपरेनुसार विधी झाले. एवढंच नाही तर काही मजेशीर खेळ खेळण्यात आले. शिवाय दोघांनी डान्स सुद्धा केला.

हेही वाचा – सुकन्या मोनेंनी सांगितले लग्नानंतर संजय यांच्यात झालेले बदल; म्हणाल्या, “खूप…”

हेही वाचा – “आजकाल कोकणी संस्कृती दाखवण्यापेक्षा माज अन्…”, ‘कोकण हार्टेड गर्ल’वर ‘त्या’ व्हिडीओमुळे टीकेचा भडीमार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुगंधाच्या डोहाळे जेवणाच्या फोटोवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र जोशी, मेघना एरंडे, मुक्ती मोहन, गौहर खान, आदिती सारंगधर, बेबिका धुर्वे अशा अनेक कलाकारांनी सुगंध व संकेतला शुभेच्छा दिल्या आहेत.