‘द कपिल शर्मा शो’ने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमातील हलके-फुलके विनोद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणत असतात. आजही या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. पण आता लवकरच हा कार्यक्रम काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

गेल्या दीड-दोन वर्षापासून कपिल शर्मा हा कार्यक्रम काही काळ थांबवत कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना या कार्यक्रमांमध्ये काही बदल करण्याची ही संधी मिळते. यापूर्वी हा कार्यक्रम काही काळ बंद होता. विनोद निर्मिती करणे हे कठीण काम आहे. त्यामुळे कार्यक्रमातील कलाकारांना थोडे विश्रांती देऊन त्यांना नंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करता येतं. याचबरोबर कास्टमध्ये काही बदल करायचे असल्यास ते करायला देखील वेळ मिळतो. यामुळे हा कार्यक्रम काही काळ बंद राहणार आहे.

आणखी वाचा : एका एपिसोडसाठी ५० लाख फी आकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती किती? स्वतःच खुलासा करत म्हणाला, “माझ्याकडे…”

या कार्यक्रमाशी निगडित एका जवळच्या सूत्राने ‘इंडियन एक्सप्रेसला’ सांगितलं, “काही दिवसानंतर कपिल शर्माला काही कामानिमित्त परदेशी जायचं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ब्रेक लावण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग कधी प्रसारित होणार हे अद्याप ठरलेलं नाही पण जून महिन्यात या कार्यक्रमाच्या या सीजनचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याचबरोबर सध्या या कार्यक्रमाची टीम एपिसोडची बँक तयार करण्यात व्यग्र आहे जेणेकरून प्रेक्षकांना फार काळ या कार्यक्रमापासून लांब राहावे लागणार नाही.”

हेही वाचा : “‘द कपिल शर्मा शो म्हणजे…” प्रसिद्ध निर्मात्याची कार्यक्रमावर टीका, शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा कार्यक्रम किती दिवसांसाठी ब्रेक घेणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. लवकरच याबाबत अधिक माहिती निर्मात्यांकडून दिली जाईल आणि पुढील काही महिन्यातच हे सर्व कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या जोमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतील.