‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरेचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत अभिनेत्याने त्याच्या सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत चेतनने शशांक हे पात्र साकारलं होतं. त्यामुळे शशांकची खऱ्या आयुष्यातील अप्पू कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर होते.

चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारपशी लग्नगाठ बांधली आहे. २०२२ मध्ये या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. तेव्हापासून अभिनेत्याचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर २२ एप्रिल रोजी चेतन-ऋजुताचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

हेही वाचा : Video : महेश मांजरेकरांना १० वर्षांपूर्वीच सुचलेलं ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं कथानक, सांगितला भावुक किस्सा

चेतन-ऋजुताच्या लग्नातील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, या सगळ्यात एका फोटोने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नात लाडक्या लेकीचं म्हणजे ऋजुताचं कन्यादान तिच्या आईने केलं. याचा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. लग्नसमारंभातील मुलीकडचे सगळे विधी ऋजुताची आई अर्चना धारप यांनी केले. यानिमित्ताने सर्वांनाच आई अन् लेकीचं एक सुंदर नातं पाहायला मिळालं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी या जोडप्याचं आणि ऋजुताच्या आईचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video : केसात गजरा, गुलाबी साडी अन्…; नम्रता संभेरावचा लोकप्रिय गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

kanyadan
कन्यादान ( फोटो सौजन्य : राजश्री मराठी )

चेतन आणि ऋजुताच्या लग्नातील लूकबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने लग्नात मोरपिशी रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी, त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज, पारंपरिक दागिने असा लूक केला आहे. तर, चेतनने लग्नात सोहळं नेसलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चेतन हा मूळचा नाशिकचा असून ‘फुलपाखरू’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. तर, ऋजुताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आतापर्यंत तिने ‘आई माझी काळूबाई’, ‘वर्तुळ’ अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.